ऐन थंडीत आदिवासी बांधवांना लाभली ब्लँकेटची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:47 PM2020-12-10T23:47:20+5:302020-12-11T01:04:46+5:30
नांदूरवैद्य : यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या इगतपुरी तालुक्यात थंडीची लाट उसळली असून, अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ओम साई मैत्री फाऊंडेशनच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

इगतपुरी तालुक्यातील मुतखेल, टेकाडवाडी, कोलटेभे, भांडकुलवाडी तसेच रतनवाडी येथील रहिवासी व रस्त्यावर असलेल्या गरजू नागरिकांना फाऊंडेशनच्या अध्यक्षांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते. या फाऊंडेशनमध्ये सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, शेतकरी, सेवानिवृत्त सैनिक, सरकारी कर्मचारी, अधिकारी आदी पदाधिकारी असल्यामुळे ते आपल्या आर्थिक उत्पन्नातील ५ टक्के रक्कम समाजासाठी मदतीच्या रूपाने देत असतात. आदिवासी बांधवांनी फाऊंडेशनचे आभार मानले. मागील वर्षीदेखील फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात विविध प्रकारची मदत केली होती, असे राजाराम ईदे, अशोक भांगरे यांनी सांगितले. याप्रसंगी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.