नाशिक : काही दिवसांपासून नाशिककरांना सलग थंडीच्या कहरचा सामना करावा लागत आहे. शनिवारपाठोपाठ रविवारीदेखील (दि.१०) किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली. येथील किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंत घसरला असल्याने हुडहुडी कायम आहे.उत्तर भारतात होणाºया बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑसह विदर्भ गारठला आहे. हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट रविवारी (दि.१०) मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा शनिवारी दिला होता. रविवारी दिवसभर वाºयाचा वेग शहरात मंदावलेला होता; मात्र शहराजवळच्या खेड्यांमध्ये तसेच उपनगरीय भागात दुपारपर्यंत वारे वेगाने वाहत असल्याचा अनुभव नागरिकांना आला. रविवारी शहराच्या किमान तापमानात एक अंशाने वाढ झाली असली तरी यादिवशी नाशिककरांना थंडीपासून फारसा समाधानकारक दिलासा मिळू शकला नाही.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टाजम्मू-काश्मीरमध्ये होणाºया जोरदार बर्फवृष्टीमुळे दिल्लीमध्येही या हंगामात हिमवर्षाव नागरिकांनी अनुभवला. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून शीतलहर महाराष्टÑात पोहचली असून, गारवा वाढला आहे. राज्यात रविवारी अहमदनगरमध्ये ४.९ तर नाशिकमध्ये ५ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. ही दोन शहरे राज्यात सर्वाधिक थंडीचा सामना मागील दोन दिवसांपासून करत आहेत.
दुसऱ्या दिवशीही कडाक्याची थंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:57 AM
काही दिवसांपासून नाशिककरांना सलग थंडीच्या कहरचा सामना करावा लागत आहे. शनिवारपाठोपाठ रविवारीदेखील (दि.१०) किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली. येथील किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंत घसरला असल्याने हुडहुडी कायम आहे.
ठळक मुद्देपारा ५ अंशांवर : वाºयाच्या वेगाने वातावरणात गारठा