नवीन विभागीय कार्यालयात होणार दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 07:36 PM2020-02-02T19:36:58+5:302020-02-02T19:43:24+5:30
शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गुणपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकाल नवीन कार्यालयात करण्यात येणार आहे
नाशिक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गुणपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकाल नवीन कार्यालयात करण्यात येईल, असा विश्वास विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी व्यक्क केला आहे.
विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासाठी आडगाव येथील पाच एकर जागेवर जवळपास २४ कोटी रुपये खर्चून मंडळासाठी तीन मजली प्रशस्त इमारत साकारण्यात आली आहे. या इमारतीचे आॅक्टोबर २०१९ पर्यंत विभागीय शिक्षण मंडळाला हस्तांतरण होणे अपेक्षित होते, परंतु डिसेंबर २०१९ उलटूनही इमारतीचे १०० टक्के काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये होणाºया दहावी व बारावीच्या परीक्षांचे कामकाज द्वारका परिसरातील वाणी हाउस येथील इमारतीतूनच सुरू आहे. त्यानुसार परीक्षेसाठी आवश्यक प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आदी साहित्याचे वितरण जुन्याच्या कार्यालयातून केले जाणार आहे. मात्र परीक्षेनंतर पेपर तपासणी व पडताळणी झाल्यानंतर प्रश्नपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकालपत्रांचे वितरण हे नवीन कार्यालयातून होण्याची शक्यता आहे. नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कार्यालय सध्या वाणी हाउस इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यरत आहे. त्यासाठी मंडळाला दरमाह ४ लाख ६९ हजार रुपये इतके भाडे मोजावे लागत आहे. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जमा होणाºया उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी गुदामही नाही. यामुळे या उत्तरपत्रिकाही कमी जागेतच साठवून ठेवत त्याची गोपनीयता जपण्याची तारेवरची कसरत मंडळाला करावी लागते. आडगाव येथील पाच एकर जागेत ९२ हजार चौरस फूट बांधकाम असलेली तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे, परंतु हा प्रकल्प पूर्ण होऊन विभागीय शिक्षण मंडळाला हस्तांतरित झालेला नाही. त्यामुळे नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये होणाºया दहावी व बारावीच्या परीक्षांची पूर्वतयारी व अन्य कामकाज जुन्याच इमारतीतून करण्याची नामुष्की विभागीय शिक्षण मंडळावर आली आहे.