वणी : आदिवासी भागांतील नागरिकांना आरोग्यसेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून, शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉक्टर पी. डी. गांडाळ यांनी केले आहे. वणी ग्रामीण रुग्गालयात तीन दिवसीय आयोजित मोफत शिबिराचा प्रारंभ गांडाळ यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक वणी व दिंडोरी ग्रामीण रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी तपासणी दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया व अंतिम दिनी शस्त्रक्रिया झालेल्यांची तपासणी अशी क्रमवारी आहे. अॕपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, फिशर, भगंधर गर्भपिशवी, दातांच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या व इतर शस्त्रक्रिया नामांकित, अनुभवी व जाणकार शल्यचिकित्सक यांच्याकडून करण्यात येणार आहे. वरखेडा, निगडोळ, पांडाणे, खेडगाव, वारे, या प्राथमिक केंद्राबरोबर वणी व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे, याप्रसंगी जि.प. सदस्य छाया गोतरणे, उपसरपंच देवेंद्र गांगुर्डे, माजी सरपंच मनोज शर्मा, माजी उपसरपंच विलास कड, रवि सोनवणे व विविध मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र बागुल, डॉ.सुजित कोशीरे, डॉ.प्रशांत खैरे, डॉ.कपील आहेर, डॉ.रत्ना रावखंडे, डॉ.पी डी गांडाळ, डॉ.नरेश बागुल, डॉ.प्रकाश देशमुख, डॉ.साबळे या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत शिबिरास प्रथम दिवशी परिसरातील नागरिकांनी तपासणीसाठी हजेरी लावली होती.
वणी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिरास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 8:58 PM
वणी : आदिवासी भागांतील नागरिकांना आरोग्यसेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून, शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉक्टर पी. डी. गांडाळ यांनी केले आहे.
ठळक मुद्देशिबिरास प्रथम दिवशी परिसरातील नागरिकांनी तपासणीसाठी हजेरी लावली