दुय्यम निबंधक कार्यालयात कामकाजाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 06:18 PM2020-06-29T18:18:20+5:302020-06-29T18:27:28+5:30

इगतपुरी : कोरोनो संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे इगतपुरी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सामाजिक अंतरासह नियम पाळत कामकाजाला प्रारंभ झाला आहे.

Commencement of work in the office of the Deputy Registrar | दुय्यम निबंधक कार्यालयात कामकाजाला प्रारंभ

फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळत खरेदी-विक्र ीचे व्यवहार करताना दुय्यम निबंधक ई. डी. देवशी.

googlenewsNext
ठळक मुद्देदैनंदिन दहापेक्षा जास्त व्यवहार होत असल्याने मुद्रांक शुल्क शासनाला मिळत आहे.

इगतपुरी : कोरोनो संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे इगतपुरी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सामाजिक अंतरासह नियम पाळत कामकाजाला प्रारंभ झाला आहे.
प्रवेशद्वारावर तापमान तपासणी, मास्क, सॅनिटायझरच्या वापरातून कोरोना रोखण्याचे येत आहे. यामुळे शेतजमिनी, इमारती आदी खरेदी विक्र ीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुय्यम निबंधक ई. डी. देवशी यांच्या नियोजनामुळे दैनंदिन दहापेक्षा जास्त व्यवहार होत असल्याने मुद्रांक शुल्क शासनाला मिळत आहे.
या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच स्वयंचलित हॅण्डसॅनिटायझर बसवण्यात आले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्र ीसाठी येणाºया वकील, स्टँपवेंडर, खरेदीदार नागरिक व साक्षीदार यांना प्रथम सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यावरच आत प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे चेहºयावर मास्क बंधनकारक केला असून, प्रत्येकाचे थर्मल स्क्र ीनिंगद्वारे ताप मोजला जात आहे.
कार्यालयातही कामकाज करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत पुढील कामकाज करत खरेदी-विक्र ीचे व्यवहार केले जात आहे. नियम न पाळणाºया नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे खरेदी-विक्र ीसाठी येताना नियम पाळणाºया नागरिकांची विनाअडथळा कामे होत असे दुय्यम निबंधक ई.डी. देवशी, वरिष्ठ लिपिक रशीद भुरीवाले यांनी सांगितले.
(फोटो २९ इगतपुरी)

Web Title: Commencement of work in the office of the Deputy Registrar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.