पोलीस आयुक्तांनी केली करागृहची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:19 PM2020-10-11T23:19:36+5:302020-10-12T01:19:34+5:30
नाशिकरोड, : पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी ्नॅरविवारी (दि.११) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन तेथील परिसराची आणि कक्षांची पाहणी केली.
नाशिकरोड, : पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी ्नॅरविवारी (दि.११) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन तेथील परिसराची आणि कक्षांची पाहणी केली.
आयुक्तांनी प्रथम साने गुरूजी कक्षास भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी कारागृहातील विविध कारखाने, महिला कक्ष, रुग्णालय, ग्रंथालय, सर्कल, अतिसुरक्षा विभाग आदींची पाहणी केली. देशातील इतर कारागृहांमध्ये करोनाचा शिरकाव झाला असताना नाशिकरोड कारागृह प्रशासनाने तो रोखल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. कारागृह आणि पोलिस प्रशासन यांच्यातील सुसंवाद, सहकार्य वाढावे यासाठी ही भेट होती. पोलिस अधिका-यांना कारागृहाची माहिती व्हावी यासाठी हा दोन तासांचा दौरा होता असे पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले.
कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांनी त्यांचे स्वागत केले. कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, कारागृह अधिकारी शामराव गिते, सतीश गायकवाड, प्रशांत पाटील, डी.बी.पाटील, एस.पी. सरपाते, पी.डी. बाबर, बी. एन. मुलानी, एस. एच. आढे, ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते. पाण्डेय यांच्या समवेत पोलिस उपायुक्त, सहआयुक्त, पोलिस निरीक्षक हे देखील उपस्थित होते.
(फोटो आणि कॅप्शन: एनएसकेला पोलीस आयुक्तांची कारागृहाला भेट नावाने पाठविला आहे. )