नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागातील आॅटोडिसीआरमुळे कामकाज ठप्प झाले असल्याने आता पुन्हा आॅफलाइन कामकाजाची मागणी होत आहे. मात्र आयुक्त गमे यांनी त्यास नकार दिला असून, त्यामुळे आॅटो डिसीआरमुक्ती तूर्तास अशक्य दिसत आहे. दरम्यान, वास्तुविशारदांच्यादेखील या विषयावर बैठक बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.महापालिकेने आॅटोडिसीआरमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नव्हते. आयुक्त गमे यांनी डिसेंबर महिन्यापासून हा विषय लावून धरण्याचा प्रयत्न केला. परंतु कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. आयुक्तांनी कंपनीला डेडलाइन देऊनदेखील बांधकाम परवानगी म्हणजेच कमिन्समेंटचे पीडीएफ मिळू शकलेले नाही. पूर्वी चारशेपर्यंत आलेले हे प्रमाण थेट पुन्हा सातशेपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे विकासक आणि आयुक्तांच्या बैठकीत गमे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करा असाही सल्ला दिला. आयुक्तांचे प्रयत्न आणि त्यांनतर कंपनीकडून मिळत नसलेला प्रतिसाद यामुळे आता जळगाव महापालिकेप्रमाणेच नाशिकमध्ये देखील आॅटोडिसीआरदेखील बंद करून आॅफलाइन पद्धतीने कामकाज सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, आयुक्त गमे यांनी त्यास नकार दिला आहे.पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी सांगितले की, संबंधित कंपनीने सांगितलेली कामे वेळेत पूर्ण केलेली नाहीत. प्रलंबित प्रकरणांची संख्या सातशेच्या घरात आहे. तथापि, दाखल होणाऱ्या प्रस्तावांच्या तुलनेत मंजूर करून प्रस्ताव निकाली काढण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत आहे. शॉर्टफॉल किंवा अन्य काही सुविधा संबंधितांनी दिल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून काम करून घेणे महत्त्वाचे आहे. आॅटोडिसीआरमध्ये अडचणी आहेत म्हणून ते बंद करून आॅफलाइन काम करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दुसरीकडे मात्र त्यांनी आॅटोडिसीआर संदर्भातील कंत्राटाची माहिती मागविली असल्याचे सांगतानाच त्यांनी संबंधित कंपनीवर कारवाईचे संकेत दिले.वास्तूविशारदांच्या बैठकीत निर्णयआॅटोडिसीआरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून अडचणी उद््भवत असून, आता सहनशक्ती संपत चालल्याचे वास्तुविशारदांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत वास्तुविशारद बैठक घेणार असून, त्यात पुढील भूमिका ठरवणार असल्याचे सांगण्यात आले.
‘आॅटोडिसीआर’मुक्तीस आयुक्तांचा नकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 2:11 AM
महापालिकेच्या नगररचना विभागातील आॅटोडिसीआरमुळे कामकाज ठप्प झाले असल्याने आता पुन्हा आॅफलाइन कामकाजाची मागणी होत आहे. मात्र आयुक्त गमे यांनी त्यास नकार दिला असून, त्यामुळे आॅटो डिसीआरमुक्ती तूर्तास अशक्य दिसत आहे. दरम्यान, वास्तुविशारदांच्यादेखील या विषयावर बैठक बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ठळक मुद्देकारवाई करण्याची तयारी : कंत्राटाची मागविली माहिती