भावली धरण परिसराच्या पर्यटन विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 12:08 AM2020-09-01T00:08:14+5:302020-09-01T01:11:49+5:30
नांदूरवैद्य : राज्यासाठी पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरणात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

इगतपुरी तालुक्यातील भावली धरण येथे भेटीप्रसंगी त्यांनी तरुणांनी साकारलेल्या पर्यटनाबाबतच्या प्रोजेक्टची पाहणी केली. पर्यटकांना आकर्षित करणारे सौंदर्य या भागात असल्याने लवकरच आवश्यक योजना राबवण्यासाठी नियोजन करणार असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक पातळीवरील वैशिष्ट्य हेरत शासन भावली धरण व त्यालगत वाहणारी नदी यांचा विचार करता हे क्षेत्र पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असून, निवासव्यवस्थेसाठी तंबूची उभारणी,
क्रीडाप्रेमींकरिता साहसी खेळांची व्यवस्था करण्याचा विचार असल्याचेही संभाजीराजे म्हणाले. यावेळी छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, गणेश कदम, शरद तुंगार आदी उपस्थित होते.