सटाणा पालिकेत विरोधकांना समित्या बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 06:43 PM2020-01-21T18:43:37+5:302020-01-21T18:43:51+5:30
विषय समित्या बिनविरोध : सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
सटाणा : येथील पालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधी बाकावरील काँग्रेसचे राहुल पाटील व राष्ट्रवादीच्या शमा मन्सुरी यांना अनुक्र मे शिक्षण, महिला व बालकल्याण समितीची जबाबदारी दिल्याने सत्ताधारी गटातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पालिकेच्या स्थायी व विषय समित्यांच्या निवडीसाठी मंगळवारी (दि. २१) पालिकेच्या सभागृहात प्रभारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष सभा घेण्यात आली. विषय समित्यांची निवड बिनविरोध झाली असली तरी काही इच्छुकांमध्ये नाराजीचा सुरु होता. पालिकेत शहर विकास आघाडी व भाजप युतीची सत्ता आहे. असे असतांना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना या निवडणुकीत संधी दिल्याने सत्ताधारी नगरसेवकांमध्ये नाराजी दिसून आली. बिनविरोध झालेल्या विषय समित्या पुढील प्रमाणे, स्थायी समिती सभापतीपदी सुनील मोरे, उपाध्यक्ष सोनाली दत्तू बैताडे, सदस्य- महेश यादवराव देवरे, राहुल सुभाष पाटील, संगीता संदीप देवरे, दीपक पकाळे, शमा आरिफ मंसुरी. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सोनाली दत्तू बैताडे, सदस्य- सुनीता कोमल मोरकर, निर्मला एकनाथ भदाणे, भारती सुभाष सूर्यवंशी. पाणीपुरवठा व जलनिसा:रण समिती सभापतीपदी संगीता संदीप देवरे, सदस्य- उत्तम बागुल, दिनकर रघुनाथ सोनवणे, सुरेखा प्रकाश बच्छाव, मनोहर दगाजी देवरे. वैद्यकीय व आरोग्य समिती सभापतीपदी दीपक पाकळे, सदस्य- सुनीता कोमल मोरकर, शेख आरिफ कासिम, आशा रमेश भामरे, भारती सुभाष सूर्यवंशी. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मन्सुरी शमा आरिफ, उपसभापतीपदी सुवर्णा दीपक नंदाळे, सुरेखा बच्छाव, पुष्पा जगन्नाथ सूर्यवंशी. शिक्षण समिती सभापतीपदी राहुल सुभाष पाटील,सदस्य- नितीन दागाजी सोनवणे, रु पाली संदीप सोनवणे, राकेश चंद्रकांत खैरनार, विद्या मनोहर सोनवणे. नियोजन व विकास समिती सभापतीपदी महेश यादवराव देवरे, सदस्य- निर्मला एकनाथ भदाणे, रु पाली संदीप सोनवणे, राकेश चंद्रकांत खैरनार, मुल्ला शमीम शफीक.