नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी आणली. मात्र, शहरात अजूनही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीनंतरही शहरातील विविध भागात प्लॅस्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्चला जारी केलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या आदेशामुळे राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने यातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील धान्य व किराणा खाद्यतेल विक्रे ते, बेकरी व्यवसाय, रेडिमेड निर्माते प्लॅस्टिक उद्योग निर्माते अशा विविध संघटनांनी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत प्लॅस्टिकच्या वापरासाठी पर्याय उपलब्ध होणे आवश्यक असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर निर्णयाला स्थगिती देण्यासह या निर्णयातील अडचणींविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी त्या क्षेत्राचे प्रतिनिधी, तज्ज्ञ व खात्याचे अधिकारी यांची संयुक्त समिती नेमण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सरकारने परिपत्रकामध्ये प्लॅस्टिक बॅगचा साठा निरगत करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असल्याचे स्पष्ट करीत प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी कायम ठेवून दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले असताना प्रशासनाकडून मात्र प्लॅस्टिक वापरणाऱ्यांक डे काणाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे.कचयाची समस्या कायमबाजारपेठेतील विविध उत्पादनांच्या वेष्टणासह औद्योगिक व कृषीमालाच्या वाहतुकीसाठीही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, या पिशव्यांपासून निर्माण होणाºया कचºयाचे व्यवस्थापन होत नसल्याने प्लॅस्टिकबंदीनंतर शहरातील विविध रस्त्यांवर प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचºयाची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे.
शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:20 AM