गरजू आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 02:16 PM2020-01-30T14:16:03+5:302020-01-30T14:16:12+5:30
पेठ - वाढती महागाई त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची यामुळे मजूरी करून गुजरान करणाऱ्या कुटुंबांना लग्नकार्याचा आर्थिक भार पडू नये यासाठी आदिवासी भागातील गरजू जोडप्यांचा सामुदाईक विवाह सोहळा संपन्न झाला.
पेठ - वाढती महागाई त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची यामुळे मजूरी करून गुजरान करणाऱ्या कुटुंबांना लग्नकार्याचा आर्थिक भार पडू नये यासाठी आदिवासी भागातील गरजू जोडप्यांचा सामुदाईक विवाह सोहळा संपन्न झाला. तोरणमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते कमलेश वाघमारे यांनी आपल्या भागातील गरजू जोडप्यांसाठी मागील वर्षी काळाराम मंदिर देवस्थानच्या सहकार्यातून १९ जोडप्यांचा सामुदाईक विवाह सोहळा घडवून आणला. तर नुकत्याच झालेल्या श्री. स्वामी समर्थ संस्थेतर्फे सहा जोडप्यांचे विवाह झाले. यापुढील काळात १०० जोडप्यांचे सामुदाईक विवाह घडवून आणण्याचे उद्दिष्ठ्य असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. याप्रसंगी सोपान वाघमारे. हनुमंत वाघमारे मुरली चौधरी,मयुर गांगुर्डे. डॉ. संतोष वैद्य,दिलीप महाले.मनोज देशमुख आदि उपस्थित होते.
----------------------------
पेठ सारख्या आदिवासी भागात लग्न समारंभात होणार्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामुदाईक विवाह समारंभात लग्न लावण्यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक असून यासाठी विविध संस्थाच्या माध्यमातून अशा प्रकारचे सामाजिक उपक्र म राबवणे सुरू असून आदिवासी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- कमलेश वाघमारे, तोरणमाळ