निफाड : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा पाशर््वभूमीवर निफाड नगरपंचायतीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सामुदायिक वॉश बेसिन ठेवण्याच्या उपक्र मास प्रारंभ करण्यात आला आहे.निफाड शहरातील जनार्दन स्वामी नगरातील ग्रामसंस्कार केंद्र, शांतीनगर, निफाड नगरपंचायत कार्यालयासमोर, कोळवाडी रोड, शनी चौक या पाच ठिकाणी ही वॉश बेसिन ठेवण्यात आली आहेत. शहरातील नागरिक या वॉश बेशिनचा वापर करीत आहे. सध्या कर्तव्य बजावत असलेले नगरपंचायतीचे कर्मचारी या वॉश बेसिनचा वापर करीत आहे. मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र व निफाड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना माफक दरात भाजीपाला खरेदी करता यावा म्हणून ग्रामसंस्कार केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. हा भाजीपाला खरेदी करण्यापूर्वी या वॉश बेसिनमध्ये नागरीक हात धुऊन मग भाजीपाला खरेदी करण्यासाठी या ग्रामसंस्कार केंद्रात प्रवेश करीत आहेत.टप्प्याटप्प्याने शहरात जवळ जवळ 15 ते 16 वॉश बेसिन बसवण्यात येणार आहे. निफाड नगरपंचायतीने राबवलेल्या या उपक्र माचे सर्वत्र कौतुक होत आहे
निफाड शहरात सामुदायिक वॉश बेसिनचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 6:49 PM
निफाड : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा पाशर््वभूमीवर निफाड नगरपंचायतीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सामुदायिक वॉश बेसिन ठेवण्याच्या उपक्र मास प्रारंभ करण्यात आला आहे.
ठळक मुद्देटप्प्याटप्प्याने शहरात जवळ जवळ 15 ते 16 वॉश बेसिन बसवण्यात येणार