नाशिक : गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात घरांच्या भरपाईसाठी ८५ लाखांची मदत मागण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकलेली नाही. गतवर्षी जूनमध्ये जिल्ह्यातून निसर्ग चक्रीवादळ जाणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तविली जात होती. परंतु पुढे सरकणाऱ्या चक्रीवादळाने दिशा बदलली आणि कोकण व नंतर मुंबईमार्गे निसर्ग चक्रीवादळ नाशिकला स्पर्शून पुढे गेले होते. या कालावधीत जिल्ह्यात जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ५३० हेक्टरवरील पिकांना या वादळाचा फटका बसला होता तर ४१५ घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घरांचे छत व पत्रे उडाले होते तर अनेक ठिकाणी भिंत खचल्या तसेच भिंतीदेखील कोसळल्याने अनेकांना रात्र उघड्यावर काढावी लागली होती. अहवाल रवानाजिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे ३०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला होता. त्यापैकी २२२ कोटी ९८ लाख ९१ हजारांची मदत जिल्ह्याला मिळाली. मिळालेल्या रकमेपैकी फळबागा, शेतपिके, पशुधन आदींसाठी २२२ कोटी १३ लाख ९१ हजारांची मदतीचा त्यात समावेश होता. त्यात घर पडझडीची मदत प्राप्त झाली नव्हती. शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे. वर्षभरानंतर का होईना या जूनमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, अशी शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
415 घरांसाठीची भरपाईही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 1:32 AM
गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात घरांच्या भरपाईसाठी ८५ लाखांची मदत मागण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकलेली नाही.
ठळक मुद्दे ८५ लाखांची मागणी : यंदा मदत मिळण्याची शक्यता