नाशिक : शहरातील बेकायदा बांधकामे पडताळून नियमित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात महासभेत जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर पदाधिकाºयांनी निर्णय फिरवला आणि ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.शहरातील बेकायदा बांधकामे पडताळून नियमित करण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेली कंपाउंडिंग योजना यापूर्वीच संपली होती त्यात २ हजार ९०० प्रकरणे दाखल झाली होती, परंतु त्यानंतरही राज्य सरकारने महापालिकेच्या मान्यतेने दोन महिने मुदतवाढ देता येईल, असे जाहीर केले होते. तसे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत सादर केला असता गेल्या महिन्यात १९ आॅगस्ट रोजी झालेल्या महासभेत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. परंतु प्रशासनाला सादर केल्यानंतर त्याची मुदत दोन महिन्याऐवजी जून २०१९ पर्यंत करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्याच्या विकास आढावा बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेने कंपाउंडिंगसाठी जवळपास वर्षभराची मुदत दिल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाने दोन महिन्यांचीच मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले आहेत.पडताळणी केव्हा..?महापालिकेने यापूर्वी एकदा कंपाउंडिंग स्कीममध्ये प्रकरणे दाखल करण्याची मुदत दिली होती त्यात २९३१ प्रकरणे दाखल झाली होती. मात्र, त्याची अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. या प्रकरणांच्या पडताळणीसाठी आयुक्तांनी शासनाला कळवून अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी मागवले आहेत. परंतु तेही अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या बांधकामांची पडताळणी केव्हा करणार? असा प्रश्न करण्यात येत आहे.
कंपाउंडिंग योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:25 AM
शहरातील बेकायदा बांधकामे पडताळून नियमित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात महासभेत जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर पदाधिकाºयांनी निर्णय फिरवला आणि ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ठळक मुद्देमहासभेने ठराव बदलला : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर फिरवला निर्णय