सक्तीमुळे कापडी मास्कला मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:13 PM2020-10-11T23:13:22+5:302020-10-12T01:18:40+5:30
नाशिक: पुणे , मुंबई शहरांसह नाशिकमध्येही नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आल्याने शहरात मास्क मोठया प्रमाणात मागणी ...
नाशिक: पुणे , मुंबई शहरांसह नाशिकमध्येही नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आल्याने शहरात मास्क मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत या आजारावर लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत नियमित मास्क वापरणे हा कोरोनापासून बचावाचा प्रभावी उपाय असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात तज्ञांनी स्पष्ट केल्याने विविध प्रकारच्या मास्क ला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
विशेष म्हणजे कोरोना व्हायरसचा कापड व्यवसायास व अन्य उद्योग व्यवसायालाही फटका बसला होता. मात्र कापडी मास्क व त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कपडास मोठी मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युज अॅण्ड थ्रो, नॉनओव्हन मास्कऐवजी कापडी मास्कची चांगलीच मागणी वाढली आहे. अशा कापडी मास्कची घाऊक किंमत ५० व २० रुपये आहे. तर किरकोळ बाजारामध्ये सध्या २२ रुपयांपासून ते २५ ते ३० रुपयांपर्यंत या मास्कची विक्री केली जात आहे. त्याचप्रमाणे विविध नामांकित कंपन्यांनी तयार केलेले मास्क अगदी ५० रुपयांपासून दीडशे ते २०० रुपयांपर्यंत मिळत असल्याने विविध गारमेंट व्यावसायिक, बचत गट, शिलाई काम करणाºया व्यवसायिकांनी सध्या मास्क बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्या अनुषंगाने मास्कसाठी लागणाºया इलॅस्टिकचीही मागणी वाढली असून तर अनेक कारागीर इलॅस्टिक उपलब्ध होत नसल्याने कपड्याची दोरी असलेले मास्क तयार करीत आहेत.