लसीकरणासाठी गेलेल्यांना अँटिजेन चाचणीची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:15 AM2021-03-28T04:15:05+5:302021-03-28T04:15:05+5:30
जिल्हा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचा लसीकरणाकडे कल वाढला आहे. १६ जानेवारीपासून नाशिक शहरात लसीकरणाला प्रारंभ करण्यात ...
जिल्हा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचा लसीकरणाकडे कल वाढला आहे. १६ जानेवारीपासून नाशिक शहरात लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात साठ वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्ष पूर्ण करणारे व्याधीग्रस्त यांनाच लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला या लसीकरणाला प्रतिसाद नव्हता. मात्र, नंतर मार्च महिन्यात कोरोना बाधितांची संख्या वाढल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यामुळे महापालिका आणि खासगी रुग्णालयात लस घेण्यास गर्दी होत आहे. त्यातच शासनाने आता १ एप्रिल पासून ४५ वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच लस देणार असल्याचे जाहीर केल्याने गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने नागरीकांची महापालिकेच्या सर्व रुग्णालये तसेच शहरी आरोग्य केंद्रात गर्दी वाढत आहे. शनिवारी (दि.२७) लस घेण्यासाठी नागरीक गेल्यानंतर महापालिकेच्या सर्वच रूग्णालयांमध्ये डाेस घेण्या आधी ँअटीजेन चाचणी करण्याची सक्ती करण्यात आलीे. कोणत्याही प्रकाराचा त्रास हाेत नसताना बळजबरीने चाचणी करण्यास सांगितल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यासाठी कोरेाना संसर्ग अगोदरच झाला असेल तर डाेस घेतल्यानंतर विपरीत परीणाम होऊ शकेल अशी कारणे देण्यात आली आणि हा शासनाचा निर्णय असल्याचे देखील सांगण्यात आले. प्रत्यक्षात केवळ शनिवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत तसे ठरवण्यात आल्याचे महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.
इन्फो...
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयात लसीकरणाआधी अँटिजेन चाचणी करण्याची सक्ती करण्यात आली असली तरी महापालिकेचे वडाळा, भारत नगर, फुले नगर, रामवाडी यासह अन्य ठिकाणी असलेल्या दवाखाने आणि शहरी आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारे चाचणी न करताच लस देण्यात आली. त्यामुळे खरोखरीच चाचणीचा निर्णय घेण्यात आला की, चाचणी करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात बसून टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, असा प्रश्न निर्माण झाला.
कोट..
कोणाला काेरोनासदृष्य लक्षण असतील किंवा काही त्रास होत असेल तर त्याची कोरोना चाचणी करण्याचे शुक्रवारी झालेल्या शासकीय बैठकीत ठरले. त्यानुसार आदेश देण्यात आले हेाते. मात्र चाचणी सरसकट सर्वांची करण्याची सक्ती नाही तर लक्षणे असलेल्यांची चाचणी करावी, असे आदेश आहेत.
- डॉ. राजेंद्र त्र्यंबके, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, महापालिका