कैलास मठात अनुष्ठान सोहळ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 09:41 PM2020-10-31T21:41:19+5:302020-10-31T21:41:37+5:30
नाशिक : पुरूषोत्तम मास अर्थात अधिकमासानिमित्त पेठरोडवरील कैलास मठात सुरू असलेल्या अनुष्ठान सोहळ्याची शनिवारी (दि.३१) मोठ्या उत्साहात सांगता झाली.
नाशिक : पुरूषोत्तम मास अर्थात अधिकमासानिमित्त पेठरोडवरील कैलास मठात सुरू असलेल्या अनुष्ठान सोहळ्याची शनिवारी (दि.३१) मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी कैलास मठाचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर स्वामी सविदानंद सरस्वती यांच्या हस्ते पूर्णाहुती, आरती व पूजन करण्यात आले.
मंदिरात प्रज्वलित करण्यात आलेल्या दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता. मंदिरात करण्यात आलेली ११०० नग केळी, ११०० नग डाळिंब या फळांसह गुलाब, चाफा आदी सुवासिक फुलांची आकर्षक सजावट लक्ष वेधून घेत होती. या कार्यक्रमात दररोज विविध फळांचा भोग चढविण्यात येत होता. यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरण दास महाराज, चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी आदींसह भक्तपरिवर उपस्थित होता. विशेष म्हणजे कोरोनाच्या पाशर््वभूमीवर फिजिकल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कार्यक्र म साध्या पद्धतीने व मोजक्या भाविकांच्या उपस्थित पार पडला.