नाशिक : शहरातील विनयनगर भागातील ‘एंजेल’ नावाच्या पक्षी, प्राणी, मासेविक्रीच्या दुकानामध्ये नाशिक पश्चिम वनविभागाने छापा मारून वन्यजीव अनुसूची-४ मधील दोन भारतीय तारा कासव आणि ४३ भारतीय पोपट मंगळवारी जप्त केले होते. दुकानमालक संशयित मझहर इस्माईल खान यास वनविभागाच्या पथकाने अटक करून बुधवारी (दि.२१) न्यायालयापुढे हजर के ले असता न्यायालयाने त्यास सशर्त जामीन मंजूर के ला.भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षण अनुसूची-४ मध्ये समाविष्ट असलेला भारतीय पोपट ही पक्ष्याची प्रजाती तसेच तारा कासव या जलचर वन्यजिवाची प्रजाती संशयित मजहरकडे आढळून आली. तब्बल ४३ पोपटांसह दोन कासव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांच्या पथकाने जप्त केले.बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी संशयित खानवर यास वनविभागाच्या कार्यालयात तपासी अधिकाऱ्यांपुढे दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हजर राहणे बंधनकारक असल्याची अट न्यायालयाने टाकली. या अटीच्या अधीन राहून न्यायालयाने खान यास जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुढील तपास भोगे करीत आहेत.
४३ पोपट बाळगणाऱ्या विक्रेत्याला सशर्त जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 1:04 AM