जानोरी : सोयाबीन उत्पादक शेतकºयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून या संदर्भात दिंडोरी तालुका कृषी अधिकाºयांकडून पिकांची पहाणी करण्यात आली.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दिंडोरी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याकारणाने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु यावर्षी पाऊस जमीनीची भूख भागवणार पडत आहे. व पाऊस चांगल्याप्रकारे पडत असून पिकाला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांची वाढ होऊ लागली आहे. सोयाबीन या पिकाला वाढ चांगली झाली आहे त्यामुळे फुले पण भरपूर लागली आहे आणि शेंगा पण भरपूर लागत आहे त्यामुळे बळीराजाने अशा काळामध्ये थोड्याया अंतराने कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करावी परंतु महागड्या औषधांची फवारणी न करता आपल्या पिकाला कीटकांपासून वाचवणारे आसरदार व कमी किमतीच्या औषधाची फवारणी करावी असा सल्ला तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी दिला आहे. तसेच जानोरी परिसरातील शेतकºयांनी जमधडे यांच्याशी संवाद साधताना सोयाबीन पिका संदर्भात समाधान व्यक्त केले आह.े यावर्षी लेट पाऊस झाला परंतु सोयाबीनला चांगल्या प्रकारे पाऊसाचा फायदा झाला आहे त्यामुळे फुले आणि शेंगा पण चांगले लागले आहे.१) प्रतिक्रि या वर्षी चांगला पाऊस पडल्याने सोयाबीन या पीकाचे वाढ प्रमाणा पेक्षा जास्त वाढ झाल्याने फुलोरा दिसत नाही परंतु खाली भरपूर शेंगा लागलेला आहे. जानोरी व मोहाडी या गावात दोन-तीन सोयाबीनचे क्षेत्र बघितले आहे.शेतकºयांनी कमी खर्चात उत्पन्न काढण्याचा प्रयत्नकेलापाहिजे.- अभिजीत जमधडे, तालुका कृषी अधिकारी, दिंडोरी.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 5:55 PM
जानोरी : सोयाबीन उत्पादक शेतकºयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून या संदर्भात दिंडोरी तालुका कृषी अधिकाºयांकडून पिकांची पहाणी करण्यात आली.
ठळक मुद्दे दिंडोरी : पिके येत नसल्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पहाणी