संघटनेच्या बैठकीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:55 AM2019-03-04T00:55:53+5:302019-03-04T00:57:45+5:30

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा काही काळ गोंधळ व बाचाबाची झाली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी देण्यात आली. बैठकीत वरखेडे, सचिन हांडगे, अनिल मंडलिक, माजी सरचिटणीस संजय कुटे आदींनी विचारलेल्या प्रश्नांची शेळके, ढोमसे यांनी उत्तरे दिली.

Confusion in the organization's meeting | संघटनेच्या बैठकीत गोंधळ

संघटनेच्या बैठकीत गोंधळ

Next
ठळक मुद्दे पोलिसांचा हस्तक्षेप : एचएएल कामगारांच्या दोन्ही गटांत बाचाबाची

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा काही काळ गोंधळ व बाचाबाची झाली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी देण्यात आली. बैठकीत वरखेडे, सचिन हांडगे, अनिल मंडलिक, माजी सरचिटणीस संजय कुटे आदींनी विचारलेल्या प्रश्नांची शेळके, ढोमसे यांनी उत्तरे दिली.
या गोंधळातच संजय कुटे यांनी कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या असलेले पाच प्रश्न उपस्थित केले. त्यास अध्यक्ष व सरचिटणीस यांनी उत्तरे न देता सत्ताधारीगटाने कुटे यांना खाली बसा असे सांगितले. तर माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही तोपर्यंत मी खाली बसणार नाही अशी भूमिका कुटे यांनी घेतली. यामुळे गोंधळ वाढतच होता, शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले. कुटे पुन्हा बोलू लागले तेवढ्यात माइक बंद करण्यात आला. पोलिसांनी सभेची वेळ संपली असे सांगितल्याने अध्यक्ष शेळके यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
ओझर टाउनशिप येथील कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष बी.व्ही. शेळके होते. व्यासपीठावर सरचिटणीस सचिन ढोमसे, कार्यकारी अध्यक्ष अशोक गावंडे, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, पवन आहेर, योगेश ठुबे, प्रकाश गबाले, कमलेश धिंगाणे, अनंत बोरसे, सचिन दीक्षित, सहचिटणीस गिरिजाकांत वलवे, दीपक कदम, आनंद गांगुर्डे, मिल्ािंद निकम, योगेश देशमुख, संतोष पोकळे, खजिनदार अमोल जोशी, संघटक सचिव मनोज भामरे हे उपस्थित होते.
दुपारी साडेतीन वाजता कोरमअभावी तहकूब करण्यात आलेल्या सभेस पावणेचार वाजता पुन्हा प्रारंभ झाला. प्रारंभी बापू भामरे यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर अध्यक्ष शेळके यांच्या हस्ते कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन करून गेल्या वर्षभरात कामगार संघटनेने केलेल्या कामाचा आढावा सभेसमोर मांडला, तसेच वेतन करार, पुढील कामाची माहिती याविषयी सभासदांना माहिती दिली. यानंतर विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन करून प्रत्येक विषयास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. खजिनदार अमोल जोशी यांनी वार्षिक जमा-खर्च व ताळेबंद मांडला. यावेळी आनंद बोरसे, सुरेश पाटील, मंगेश थेटे,राजू मोरे, राजशेखर जाधव नितीन पगारे, मन्सूर शेख, प्रसाद गायकवाड, महेंद्र जाधव, जाहिद खान, सागर कदम, रमेश कदम, नवनाथ मुसळे, रमेश कदम, सुनील जुमळे, चेतन घुले, संतोष अहेर यांचे सह आजी माजी पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन बापू भामरे यांनी केले तर योगेश देशमुख यांनी आभार मानले.दोन्ही गटांकडून घोषणाबाजीसंजय कुटे यांनी माइकचा पुन्हा ताबा घेतला आणि शांततेत सुरू असलेल्या सभेत सत्ताधारी गटाकडून त्यांना बोलू देण्यास विरोध केला गेला. यामुळे विरोधी गटासह दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली व सभेत गोंधळास सुरुवात झाली. दोन्ही गट ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या गोंधळातच बाचाबाचीचे प्रकारही घडले.

Web Title: Confusion in the organization's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Ozarओझर