भुजबळ यांच्या सल्ल्याने  ठरणार कॉँग्रेसचे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:05 AM2019-09-24T02:05:40+5:302019-09-24T02:06:08+5:30

राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची विरोधकांकडून चर्चा झडवली जात असताना दुसरीकडे भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्टवादीबरोबरच कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या ‘भुजा’त बळ भरण्यास सुरुवात केली आहे.

 Congress candidate to be Bhujbal's counsel | भुजबळ यांच्या सल्ल्याने  ठरणार कॉँग्रेसचे उमेदवार

भुजबळ यांच्या सल्ल्याने  ठरणार कॉँग्रेसचे उमेदवार

Next

नाशिक : राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची विरोधकांकडून चर्चा झडवली जात असताना दुसरीकडे भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्टÑवादीबरोबरच कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या ‘भुजा’त बळ भरण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी गुप्त चर्चा करून भुजबळ यांनी ‘मनात काही ठेवू नका’ असा निरोप देत काही मतदारसंघांत कॉँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांना सर्वोपरि मदत करण्याचा शब्द दिला आहे.
गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अधिक महत्त्वाची आहे. त्यासाठी पक्षाच्या आदेशावरून भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्णातील राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा शोध घेण्याबरोबरच मित्रपक्ष कॉँग्रेसचीही अप्रत्यक्ष जबाबदारी उचलली आहे.
चांदवडमधील एका माजी आमदाराने भुजबळ यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याबाबत सल्ला घेतला आहे. भुजबळ यांनीदेखील जागावाटपात काय होते ते बघू, परंतु एकसंघ होऊन काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. रविवारी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही भुजबळ यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीची चर्चा केली. सुमारे अर्धातास ‘बंद खोलीत’ सुरू असलेल्या या चर्चेत नेमके काय ठरले हे कळू शकले नसले तरी, निवडणुकीविषयी कॉँग्रेसची सध्याची तयारी, संभाव्य उमेदवार व त्यांची राजकीय गणिते भुजबळ यांनी जाणून घेतली.
जागावाटपाची लवकरच घोषणा होईल, त्यानुसार दोन्ही पक्षांनी एकदिलाने काम करण्याचे त्याचबरोबर मनात काही ठेवू नका, काही मदत लागली तर सांगा असा निरोपही कॉँग्रेसच्या नेत्यांना भुजबळ यांनी दिला.
इगतपुरी, चांदवड मतदारसंघाकडे लक्ष
इगतपुरी मतदारसंघ जागावाटपात कॉँग्रेसला सुटणार असला तरी, येथील कॉँग्रेसच्या आमदाराने सेनेत प्रवेश केल्याने कॉँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याचे पाहून भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे एका सदस्याला कॉँग्रेसमध्ये पाठविण्यात भुजबळ यांनीच मोठी भूमिका बजावल्याची चर्चा होत आहे. या इच्छुकाने कॉँग्रेस प्रवेश करताच, त्यांना पक्षाकडून उमेदवारीचा शब्द मिळवून देण्यात भुजबळ यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जात असून, असाच प्रकार चांदवड मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराबाबत घडला आहे.

Web Title:  Congress candidate to be Bhujbal's counsel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.