नाशिक : केंद्र सरकारने तडका-फडकी बाजार भावांवर अंकुश ठेवण्यासाठीचे कारण पुढे करत कांदा निर्यातबंदी जाहीर केल्यानं शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले असून, ही निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी अन्यथा जिल्'ात आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाने दिला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. केंद्र सरकारने सहा महिन्यात अशा प्रकारची कांदा निर्यात बंदी दोनदा लादल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
तसेच गेल्या पाच सहा महिन्यात कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले असताना. त्यात ही निर्यातबंदी जाहीर करून केंद्र सरकारने शेतकºयांची कंबरडेच मोडले असल्याची भावना शेतकरी वर्गात आहे म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तात्काळ न उठवल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी दिला. यावेळी उपाध्यक्ष रमेश कहांडोळे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, रामचंद्र चौधरी, अफजल शेख, रेहमान शहा , धर्मराज जोपळे, मिलिंद उबाळे, रवींद्र घोडेस्वार, शिवाजीराव बर्डे, संजय निकम आदी उपस्थित होते.