आदिवासी भिल्ल समाजाची दफनभूमी वाचवा कॉँग्रेसचा ठिय्या : तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 06:41 PM2018-08-31T18:41:43+5:302018-08-31T18:42:06+5:30
सिन्नर : आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमणे होत असून समाजाची दफनभूमी वाचविण्यासाठी प्रशासाने गांभीर्याने लक्ष घालावे या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार व मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, राजकिरण नाईक, जानकाबाई नाईक, शिल्पा नाईक, संगीता मोरे, किसन हांडगे, किशोर कुंवर यांनी या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. संगमनेर नाक्यावरील हिंदू, मुस्लीम व भिल्ल समाजाची स्मशानभूमी आहे. आदिवासी भिल्ल समाजातील काहीजण अग्निडाग देतात तर गरीब कुटुंबातील काहीजण दफनविधी करतात. मात्र या जमिनीवर अतिक्र मणे होत असल्याची तक्रार कॉँग्रेसच्यावतीने तहसीलदार व मुख्याधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शहर व तालुक्यात आदिवासींच्या जमिनी धनदांडगे बळजबरीने हिसकावून घेत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आदिवासींना शासनाकडून मिळालेल्या जमिनी काही बिल्डर विसार पावती व साठेखत करारनामा करुन जमिनीचे बेकायदा व्यवहार करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सहा-सात वर्षे उलटून व्यवहार पूर्ण करत नाही. आदिवासींची अडवणूक केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ठिय्या आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेतील अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर तहसीलदार गवळी यांची भेट घेऊन मागण्या मांडण्यात आल्या.