साल्हेर किल्ला विजयास ३४९ वर्षेपुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:30 AM2020-01-08T00:30:07+5:302020-01-08T00:33:28+5:30
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यातील शिवकालीन, ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या विजयास रविवारी ३४९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साल्हेर किल्ल्यावर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यातील शिवकालीन, ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या विजयास रविवारी ३४९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साल्हेर किल्ल्यावर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
साल्हेर किल्ल्याचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांचे वंशज सोनालीराजे पवार, सत्तरसिंग सूर्यवंशी, किरणराजे भोसले, विजय काकडे, राणी भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ल्याच्या पायथ्यापासून कालिका मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. नरवीर सूर्यराव काकडे यांच्या समाधीचे पूजन करण्यात येऊन शिवरु द्र यज्ञविधी व महापूजा पार पडली.
यावेळी संपूर्ण परिसर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला होता तर भगव्या झेंड्यांनी शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फेगेल्या पाच वर्षापासून साल्हेर विजय दिवस साजरा केला जातो.
विजय दिनानिमित्त प्रतिष्ठानच्या सदस्यांनी एक दिवस आधी किल्ल्यावर मुक्कामी राहून स्वच्छता व सजावट केली. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पालखीची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
त्याआधीच गडावरील सर्व समाध्या व देवतांची पूजा करून युद्धभूमी, पाण्याचे सर्व कुंड तसेच तलावांची व ध्वजांची पूजा करून सर्व दरवाजे, बुरुज, तटबंदी, मंदिरे ध्वज व फुलांच्या माळांनी सजविण्यात आले.
परशुराम महाराजांच्या मंदिराबाहेर चाळीस फुटाचा ध्वज चढविण्यात आला. यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष संतोष हसुरकर, उपाध्यक्ष अजित राणे, तालुकाध्यक्ष रोहित जाधव, प्रवीण खैरनार, हेमंत सोनवणे, पंकज सोनवणे, हर्षवर्धन सोनवणे, सागर सोनवणे, विजय शिवदे, शेखर मुळे, सागर गरु डकर आदिवासी बांधव व दुर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल पथकाचे आकर्षण एव्हरेस्ट शिखर सर करणारे व भारतीय लष्करात चोवीस वर्ष सेवा बजावणारे माणिक निकम यांच्यासह भरत सोनवणे, हिरामण आहेर यांनी नाशिक येथून विजय दिवसासाठी सायकलने प्रवास करून कार्यक्र मास उपस्थिती लावली. तसेच महाराष्ट्रातील गडिकल्ले व जगातील सर्वात जास्त उंचीवर वादन करणारे एकमेव विश्वविक्र मी सिंहगर्जना ढोल पथक यंदाच्या कार्यक्र माचे प्रमुख आकर्षण ठरले.