इंदिरानगर : परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर भरणाऱ्या अनाधिकृत भाजीबाजारामुळे वाहतुकीची कोंडी होत असली तरी या बाजारामुळे अधिकृत भाजीबाजारात बसणाºया विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.वडाळा -पाथर्डी रस्त्यालगत इंदिरानगर, विनय नगर, सार्थक नगर, सराफ नगर, पांडव नगरी, शरयू नगरी, कलानगर यासह विविध उपनगरे आहेत त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ये जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते परंतु याच रस्त्यावर ठीक ठिकाणी भरणाºया अनधिकृत भाजीबाजारामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होऊन लहान-मोठे अपघात घडत होते. याची दखल घेत महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या साईनाथ नगर चौफुलीवर व कलानगर येथील कृष्णकांत भाजी मार्केट याठिकाणी भाजी विक्रेत्यांना भाजी बाजार बांधून ओटे उपलब्ध करून दिले तरीही सावरकर चौक, जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर, राजे छत्रपती चौक ते सार्थक नगर बस थांबा, वडाळा पाथर्डी रस्ता ते पांडवनगरी, पिंगळे चौक, कानिफनाथ चौक ते भगवती चौक सह परिसरातील रस्त्यावर सकाळ व सायंकाळी दुतर्फा भाजी विक्रेते ठाण मांडून बसतात त्यांच्याकडे येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात त्यामुळे रस्त्यावर मार्गक्रमण करणाºया वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते यातूनच लहान-मोठे अपघात घडत आहे तसेच भाजीबाजारात बसणारे विक्रेत्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाजीबाजार असूनही नसल्यासारखा असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहेरस्त्यावर भरणाºया भाजी बाजारावर कारवाई करावी अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. पूर्व विभागाचे अतिक्रमण विभागाच्या गलथान कारभारा वरून प्रभात सभेत सदस्य मनपा प्रशासनाला धारेवर धरतात तरीही परिस्थिती सुधारत नाही हे यावरून लक्षात येते.