कालावधी उलटुनही कामे पुर्णत्वास नेण्याचा ठेकेदाराला मुहुर्त सापडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 03:52 PM2021-03-07T15:52:31+5:302021-03-07T15:54:54+5:30

त्र्यंबकेश्वर : रखडलेल्या कामांना ठेकेदारांना मुहूर्त सापडत नाही. वर्षभरापासुन ही कामे आजही आहेत्या स्थितीत आहेत. पण या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांना कामे पुर्ण करण्यासाठी अद्याप वेळच मिळत नाही. अर्थात ही परिस्थिती आहे, गणेशगाव (वा) विनायकनगर येथील !

The contractor could not find the time to complete the work even after reversing the period! | कालावधी उलटुनही कामे पुर्णत्वास नेण्याचा ठेकेदाराला मुहुर्त सापडेना !

कालावधी उलटुनही कामे पुर्णत्वास नेण्याचा ठेकेदाराला मुहुर्त सापडेना !

googlenewsNext
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ठेकेदारांची मनमानी

त्र्यंबकेश्वर : रखडलेल्या कामांना ठेकेदारांना मुहूर्त सापडत नाही. वर्षभरापासुन ही कामे आजही आहेत्या स्थितीत आहेत. पण या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांना कामे पुर्ण करण्यासाठी अद्याप वेळच मिळत नाही. अर्थात ही परिस्थिती आहे, गणेशगाव (वा) विनायकनगर येथील !

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ठेकेदारांची मनमानी सुरु असल्याचे दिसते. जर एखादे काम फक्त मंजूर होत नाही कुठे तो तोपर्यंत ते काम आपल्यालाच कसे मिळेल. याची ठेकेदाराला जणु प्रतिक्षाच लागलेली असते. त्यासाठी अगोदरच ते फिल्डींग लाउन ठेवतात.आणि एकदा काम मिळाले की कधी त्या कामाला सुरुवात करुन अर्धवट स्थितीत ठेवतात. पुन्हा दुस-या कामासाठी फिल्डींग लागलेली असते. आणि अशीच कामे बहुतेक गावामध्ये दिसतात.
गेल्या एक वर्षांपासून गणेशगाव (वा) येथील ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात असलेल्या विनायक नगर येथील सांडपाणी गटारीचे काम कशामुळे अडले आहे, हे संबंधीत ठेकेदार व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनाच माहित ! अन्य लोकांना या बाबत काहीच माहित नाही.

विनायकनगर येथील जे काम आहे ते आदिवासी विभाग ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत असून या कामासाठी अगोदर ठेकेदार यांनी आपल्या स्वखर्चाने पूर्ण करावयाचे असते. व त्या नंतर झालेल्या कामाची पाहणी करुन संबंधित अभियंता यांच्याकडून कामाचा अभिप्राय येउन काम पुर्ण झाल्यास एक तर फायनल बीलाची शिफारस करता येते किंवा काम अजुन बाकीअसल्यास तेवढ्या भागाचे पार्ट पेमेंट अभियंता यांच्या शिफारशीने काढता येते. तसेच नीटनेटके पणे काम झाले असल्यास कामाचा दर्जा ओळखून शिफारस केली जाते.
परंतु विनायकनगरात जे काम केले आहे, तेही अर्धवट आणि ढिसाळ, निकृष्ठ असून त्याचा दर्जा राखलेला नाही. उलट हे काम जरी एखाद्याच्या नावावर असले तरी हे काम ग्रामपंचायत यांच्यामार्फत असून त्यावर देखरेख ठेवणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. परंतु याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष नाही.

या खेरीज हे काम ज्या ठिकाणी केले आहे ती पहिली बाजू योग्य आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी जे उर्वरित काम आहे, त्या ठिकाणी कुठला नाला नाही किंवा तिथं फारच गरज आहे. यावर अभियंता जो कुणी असेल त्यालाही ते पटण्यासारखे आहे काय ही वस्तुस्थिती आहे. या मुळे सर्व कारभारच संशयात आहे. या कामाबाबत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चौकट...
या पूर्वीही विनायकनगर या ठिकाणी जे समाज मंदिराचे काम केले होते त्या ठेकेदारांने फक्त कॉलम उभे केले आणि अर्धवट काम सोडून पुन्हा त्या कडे कधीही फिरून पाहिले नाही.शेवटी ते काम गावं वर्गणी जमा करून पूर्ण केले.त्याची जरा सुध्दा चौकशी झाली नाही. आता हे काम सुध्दा तशाच स्वरुपाचे असून ठेकेदार फक्त उडवा उडवीचे उत्तर देत आहे.

प्रतिक्रिया :
या कामाचे अजून पैसे आले नसल्याने काम रखडले आहे. पैसे आल्यास त्या कामाला सुरुवात होईल.
- नाना आहेर, शाखा अभियंता
हे काम ग्रामपंचायतीचे असून ते वेळेत पूर्ण व्हावे. काम आदिवासी विकास विभागाचे व ठक्कर बाप्पा योजनेतून असल्याने ते काम पूर्ण केल्याशिवाय त्याचे बिले अदा केली जात नाही ते अगोदर ठेकेदाराला स्व खर्चाने करावे लागते.

- सांगळे ग्रामसेवक
माझ्या घरापासून जे काम घेतले आहे ते अर्धवट असून या ठिकाणी कुठला नाला नाही व या ठिकाणी हे काम करण्याची गरज नाही म्हणून कृत्रिम नाला खोदून विनाकारण खर्च करण्यात आल्याचे लक्षात येत असून या कामाला माझा विरोध आहे.
पांडुरंग खोटरे, ग्रामस्थ. (०६ टीबीके १,२,३)

कालावधी उलटुनही कामे पुर्णत्वास नेण्याचा ठेकेदाराला मुहुर्त सापडेना !
लोकमत न्युज नेटवर्क

Web Title: The contractor could not find the time to complete the work even after reversing the period!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.