दापूर ग्रामस्थांच्या मदतीतून प्राथमिक आरोग्य केंद्रास हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:01 PM2020-06-18T13:01:48+5:302020-06-18T13:02:00+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत विविध आवश्यक सुविधा व सुधारणा करण्यासाठी ग्रामस्थांनी जवळपास २६ हजारांची मदत दिली असून, ही रक्कम आरोग्य केंद्राकडून सुपूर्द करण्यात आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनामार्फत सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्या तरी काही सुविधांसाठी मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या समस्या गावपातळीवर सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राच्या समस्या सोडवून त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. गणपत आव्हाड, भास्कर आव्हाड , गणपत घुले , निवृत्ती बेदाडे , रामनाथ आव्हाड , निवृत्ती तुकाराम घुगे, सोमनाथ काशिनाथ आलगट , विश्वनाथ कचरु आव्हाड , रामनाथ रामचंद्र आव्हाड आदींनी मदत केली आहे. तसेच सुनील आव्हाड व ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, बेस्टचे अधिकारी यांनी मोलाची मदत व सहकार्य केले. यापुढेही काही दानशूर लोकांशी संपर्क साधून अधिकाधिक निधी आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, डॉ. राहुल हेंबाडे यांच्याकडे ग्रामस्थांनी मदतीचा धनादेश सुपुर्द केला.