शंभूराजेंच्या चारित्र्यहननाचे कारस्थान : आबा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:34 AM2019-05-15T01:34:28+5:302019-05-15T01:34:41+5:30
छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची जबाबदारी अभिमानाने पेलत वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले. परंतु, वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहिणारे ‘महान संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे’, ‘नाईकाभेद’, ‘सातसतक’ यांसारखे ग्रंथ, ‘हिंदी’, ‘ब्रज’ ‘भोजपुरी’ भाषेतील महान ग्रंथ लिहिणारे महान हिंदी पंडित म्हणजे शंभूराजे आणि अवघ्या साडेआठ वर्षाच्या वयात आगऱ्याहून निसटताना छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्यात पोहोचण्यासाठी स्वत: मथूरेत थांबणारे संभूराजे आम्हाला कोणी सांगितलेच नाही, उलट त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे कारस्थान आमच्याच काही बखरकार, इतिहासकार, नाटककार, कथा, कादंबरीकारांनी केल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. आबा पाटील यांनी केले.
नाशिक : छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची जबाबदारी अभिमानाने पेलत वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले. परंतु, वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहिणारे ‘महान संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे’, ‘नाईकाभेद’, ‘सातसतक’ यांसारखे ग्रंथ, ‘हिंदी’, ‘ब्रज’ ‘भोजपुरी’ भाषेतील महान ग्रंथ लिहिणारे महान हिंदी पंडित म्हणजे शंभूराजे आणि अवघ्या साडेआठ वर्षाच्या वयात आगऱ्याहून निसटताना छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्यात पोहोचण्यासाठी स्वत: मथूरेत थांबणारे संभूराजे आम्हाला कोणी सांगितलेच नाही, उलट त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे कारस्थान आमच्याच काही बखरकार, इतिहासकार, नाटककार, कथा, कादंबरीकारांनी केल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. आबा पाटील यांनी केले.
गोदातीरावरील यशवंत देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.१४) पंडितराव खैरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. आबा पाटील यांनी ‘शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज’ विषयावर व्याख्यान देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतचा व त्यांच्यानंतर स्वराज्य रक्षणासोबतच विस्तारासाठीचे संभाजी महाराज यांचा संघर्ष उपस्थिताना उलगडून सांगितला. संभाजी महाराज अतिशय अभ्यासू असल्यानेच त्यांनी १६ भाषा अवगत करून विविध साहित्यरचनांची निर्मिती केली, तसेच या अभ्यासाच्या वृत्तीतून त्यांनी प्रत्येकवेळी शत्रूवर मात केली. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनीही त्यांचा आदर्श घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचा विचार करणारे होते. त्यातूनच त्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सारामाफी देत शेतकऱ्यांना सुखावले. त्याचप्रमाणे महाराणी येसूबार्इंना त्यांच्या अनुपस्थितीत राज्यकारभाराचे अधिकार देऊन राजकारणातही महिलांना ५० टक्के आरक्षणाचीही मुहूर्तमेढ रोवल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. शिरीष राजे, प्रकाश भुतडा, निर्मला खर्डे, नगरसेवक शाहू खैरे आदी उपस्थित होते.
आजचे व्याख्यान
वक्ता : रविराज गंधे
विषय : प्रसार माध्यमे आणि
वाचन संस्कृती.