लिलावासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 04:10 PM2020-03-20T16:10:05+5:302020-03-20T16:10:40+5:30
देवळा : कोरोना रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व बाजार समित्यांनी उचित उपाययोजना करणे बाबत राज्याचे पणन संचालक सुनिल पवार यांनी परिपत्रकाद्वारे केलेल्या सुचनेप्रमाणे देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या दोन्ही आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .
देवळा कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या वतीने संभाव्य कोरोना विषाणू बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कोरोना विषाणू विषयी माहीती देणारा फलक लावण्यात आला आहे. लिलावासाठी होणाº्या शेतकº्यांच्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी दोन अतिरीक्त कर्मचाº्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दि . १६ रोजी बाजार समतिीत कांद्याचे लिलाव सुरु झाल्यानंतर बाजार समितीचे उपाध्यक्ष रमेश मेतकर, संचालक चंद्रकांत आहेर, काकाजी शिंदे, सचिव माणिक निकम आदींनी कांदा विक्र ीसाठी आलेल्या शेतकº्यांशी चर्चा केली.कोरोणा विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकº्यांनी गर्दी करू नये, व्यापार्यांनी सुरूवातीलाच मोठी बीट देवून लवकर लिलाव करावा, खोळंबा करू नये,आदी सूचना देण्यात आल्या.
यावेळी कांदा व्यापारी भुषण संकलेचा, भुषण ठुबे, महेंद्र देवरे, धनंजय देवरे, राहुल ठुबे, राहुल मेतकर, आप्पा आहेर, अनिल पगार, दिनकर सूर्यवंशी, अमोल आहेर, दीपक गोसावी, नितीन मेतकर, प्रमोद गुंजाळ, भुषणपगार आदी उपस्थित होते.
**** बाजार समित्यांच्या आवारामध्ये आवक होणारा अन्नधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला आदी शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंचा भाग आहे.जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व्यापार ग्राहकांच्या दृष्टीने सुरळीत चालू रहाणे अत्यंत आवश्यक आहे आणि शेतक-यांनाही शेतमाल विक्र ीमध्ये कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची बाजार समितीमार्फत दक्षता घेण्यात येत आहे.
*