अधिवेशनाची सुरुवात दीपप्रज्वलन व आदिनायक बिरसा मुंढा,आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या मेळाव्यासाठी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पांडुरंग गांगड, शिवराम झोले,काशिनाथ मेंगाळ,सभापती सोमनाथ जोशी, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे,राज्य उपाध्यक्ष मोतीराम पवार,राज्य सरचिटणीस एस. के. चौधरी, राज्य नेते मनोहर टोपले,उत्तम भवारी, जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे, दिलीप तलवारे, गोविंद गिलंदे, पांडुरंग शिंदे, भगवंत झोले, इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊराव बांगर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक ज्ञानेश्वर भोईर यांनी केले. संस्थापक राज्याध्यक्ष हिरामण टोपले यांनी आदिवासी भागात अवघड सोपे भाग न करता संपूर्ण तालुका अवघड क्षेत्रात दाखवणे गरजेचे असल्याचे सांगत इगतपुरी व त्र्यंबक तालुका पेसा व नक्षलग्रस्त भागात समाविष्ट करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी व सदस्य विठ्ठल लंगडे यांनी अधिवेशनातून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागत असल्याने अधिवेशन काळाची गरज असल्याचे सांगितले. आदिवासी शिक्षकांनी समाजाला पुढे येण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे असे आवाहन गांगड यांनी केले. यावेळी आमदार खोसकर यांनी आदिवासी शिक्षक आदिवासींचे प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी व आदिम संस्कृती वाढीसाठी प्रयत्न करीत असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. माजी आमदार शिवराम झोले यांनी कोविडचे शून्य टक्के प्रमाण असल्याने व ऑनलाईनसाठी नेट नसल्याने सर्व जिल्हा परिषद शाळा लवकर सुरु कराव्यात अशी मागणी केली.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, जिल्हाध्यक्ष तळपाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
इन्फो...
मुलाला आयएएस करणार
राजकारणात स्थिरता नसते कोण कधी टांग मारुन पाडेल याची शाश्वती नसते. त्यामुळे माझ्या मुलाला उत्तम प्रतीचे शिक्षण देऊन त्याला चांगला आयएएस अधिकारी करणार असल्याचे सांगत आदिवासी समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे असे आवाहन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी केले.
===Photopath===
250121\25nsk_2_25012021_13.jpg
===Caption===
सिन्नर-घोटी फाटा येथे आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेच्याअधिवेशनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, सोमनाथ जोशी, हरिदास लोहकरे आदी.