येवला : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा 85 वा वर्धापनदिन यंदा कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, समाजकल्याण बार्टी विभागाचे आयुक्त माधव वाघ, समाजकल्याण संशोधन अधिकारी पल्लवी पगारे आदींच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नामदेव पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर क्रांतिस्तंभास उपस्थितांनी मानवंदना दिली. याप्रसंगी भुजबळ संपर्क कार्यालयाचे बाळासाहेब लोखंडे, देवीदास निकम, प्रकाश कोल्हे, वसंत पवार, भगवान साबळे, गुड्डू जावळे, संजय पगारे, दत्तू वाघ, भाऊसाहेब गरुड, भाऊसाहेब जाधव, सुनील निकाळे, सुभाष गांगुर्डे, गौरव पगारे, पंचम साळवे, रवींद्र सोनवणे, शांताराम पगारे, विजय घोडेराव, वसंत घोडेराव, बापूराव पगारे आदी उपस्थित होते.दरम्यान, भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कोविड नियम पाळत साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतीस्तंभ व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रेखाताई साबळे, सविताताई धिवर, मोहन आंढागळे, राजेंद्र कांबळे यांनी मानवंदना दिली. शशिकांत जगताप, कांतिलाल पठारे, वालुताई जगताप, रेखाताई पगारे, सुभाष पगारे, वर्षा साबळे, रंजना पठारे, गौरव साबळे यांनी बुध्द वंदना घेतली. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर मुक्तीभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त होता. मुक्तिभूमी स्मारक परिसरात पोलिसांनी बॅरिकेड उभारले होते.
धर्मांतर घोषणा वर्धापनदिन साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:45 PM
येवला : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा 85 वा वर्धापनदिन यंदा कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.
ठळक मुद्दे धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कोविड नियम पाळत साजरा करण्यात आला.