नाशिक : जिल्'ातील प्रत्येक गावातील टंचाई दूर करण्यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाने परस्पर समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करावे, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत मुंडे म्हणाल्या की, योजनेच्या यशासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. जिल्'ातील अधिक टंचाई असलेल्या भागातील गावात प्राधान्याने हे अभियान राबविण्यात यावे. गावातील जलस्त्रोत दुरु स्ती, बळकटीकरण, गाळ काढणे आदि कामे हाती घेऊन पावसाचे पाणी गावातच अडविण्याचा आणि मुरविण्याचा व्यापक प्रयत्न लोकसहभागातून करण्यात यावा. या कामांसाठी जिल्हा योजनेतून निधीची तरतूद करण्यात यावी. अभियान राबविताना त्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करून आवश्यकतेनुसार क्रि यान्वयनात सुधारणा करण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत जिल्'ात हाती घेण्यात आलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली.
‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या यशस्वीतेसाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक : पंकजा मुंढे
By admin | Published: February 09, 2015 1:16 AM