नाशिकमध्ये कोथिंबीर २० रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:50 AM2018-10-22T11:50:34+5:302018-10-22T11:52:08+5:30
फळे,भाजीपाला : कमी आवकेमुळे नाशिकमध्ये मेथी, कोथिंबिरीचे दर वाढले असून, कारल्याचे दर मात्र घसरले आहेत.
थांबलेला पाऊस, वाढलेल्या तापमानामुळे लाल कांद्याचे आगमन लांबले. कमी आवकेमुळे नाशिकमध्ये मेथी, कोथिंबिरीचे दर वाढले असून, कारल्याचे दर मात्र घसरले आहेत.
गेल्या गुरुवारी कोथिंबिरीची ५५,००० जुड्यांची आवक झाली. गावठी कोथिंबीरला भाव साधारणत: दोन हजार ते ३,९०० रुपये शेकडा होता, तर मेथीची चार हजार जुड्या आवक होऊन भाव २,००० ते ३,७०० रुपये शेकड्यापर्यंत होते. गुरुवारी २६४ क्विंटल ढोबळी मिरचीची आवक होऊन १,८७५ ते २,८७५ प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
टमाटा, वांंगी, फ्लॉवर, कोबी, भोपळा, दोडका, गिलके या फळभाज्यांची आवक होऊनही दरात फरक पडला नाही.
आवक स्थिर असल्याने फळांच्या दरात बदल झाला नाही. डाळिंबाला २५० पासून ३,५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव आहे, तर सफरचंद ५,५०० पासून ९,५०० रुपये क्ंिवटलपर्यंत विकल्या गेले.