कोरोनाने कांद्यालाही फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 03:32 PM2020-03-20T15:32:55+5:302020-03-20T15:33:08+5:30

हॉटेल व्यवसाय ठप्प : उठाव नसल्याने दरात घसरण

 Corona also burst the onion into sweat | कोरोनाने कांद्यालाही फोडला घाम

कोरोनाने कांद्यालाही फोडला घाम

googlenewsNext
ठळक मुद्दे कोरोना इफेक्टने बाजारपेठ सगळ्यात जास्त बाधित

येवला : आधी अवकाळी पावसाचा फटका, नंतर निर्यातबंदीमुळे बसलेला धक्का आणि आता कोरोनाचा विळखा या दुष्टचक्रात कांदा उत्पादक सापडले असून, कोरोनामुळे हॉटेल्ससह अन्य व्यवसाय ठप्प झाल्याने कांद्याला बाजारपेठ मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा मेटाकुटीला आला आहे.
जगभरात कोरोनाने दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन, शासन यंत्रणा सज्ज असून, सर्वच स्तरावर काळजी घेतली जात आहे. मात्र, या कोरोना इफेक्टने बाजारपेठ सगळ्यात जास्त बाधित झाली आहे. त्यात कांंदा उत्पादक व व्यापारीवर्गाला मोठा फटका बसला आहे. यंदा उन्हाळ व रांगडा कांदा एकाच वेळी स्थानिक बाजारात आला आहे. परराज्यासह महाराष्ट्रात कांदा आवक वाढली आहे. त्यात भर म्हणून कोरोनामुळे हॉटेलसह इतर व्यवसाय ठप्प झाले, परिणामी कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. मागणी घटल्याने दरात घसरण होत असून, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कांदा काढणे आणि विकणेदेखील मुश्कील
कांद्याला मागच्या वेळेस पंधराशे ते दोन हजार रुपये पर्यंतचा दर होता. आता अकराशे ते आठशे रु पयांपर्यंत दर आहे. त्यामुळे कांदा काढणे आणि विकणेदेखील मुश्कील झाले आहे.
- श्रावण जाधव, कांदा उत्पादक शेतकरी

Web Title:  Corona also burst the onion into sweat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.