लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार धुमाकूळ सुरु केला असल्याने आरोग्य व महसुल यंत्रणा गतीमान झाली असुन निफाड तालुक्यातील दोन्ही कोव्हीड उपचार केंद्रात रूग्णांची संख्या वाढल्यामुळे बेडस पुर्ण झाले आहेत. दररोज तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णाचे वाढते प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी संपर्क होऊ नये याकरीता कामाव्यतिरिक्त बाहेर पडु नये असे आवाहन निफाड तालुका गटविकास अधिकारी संदिप कराड व कोरीना संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी केले आहे.निफाड तालुक्यातील सध्या ८९९ रूग्ण असुन निफाड तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे.नाशिक ग्रामीण भागात ६९०८ रूग्ण असुन तालुक्यातील संख्या अशी...नाशिक : ४०८,बागलाण :७७, चांदवड : ४६३, देवळा : ९०४. दिंडोरी : ३७६, इगतपुरी : ३१९, कळवण : २४७, मालेगाव : ५६३, नांदगाव :७८०, पेठ : ४१, सुरगाणा : ७३, त्र्यंबक : ८६, येवला : ३७५ अशी गुरुवारी (दि.२५) परवा निफाडच्या प्रांत डॉ अर्चना पठारे यांनी तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदिप कराड यांचेसह अधिकारी यांनी लासलगावी कोरोनाबाबत बेफिकिरी दाखविणारे नागरिकांना व दुकानमालक यांना दंड केल्याने त्याचा परीणाम निफाड तालुक्यातील विविध गावात झाला आहे.एरव्ही कांदा विक्रीसाठी सकाळी गजबजणारी लासलगावची बाजारपेठ आणि सर्वच मुख्य रस्त्यासह शनिवारी लहान मार्गावरच दुकाने बंद होते.
कोरोनामुळे लासलगावी रुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 6:45 PM
लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार धुमाकूळ सुरु केला असल्याने आरोग्य व महसुल यंत्रणा गतीमान झाली असुन निफाड तालुक्यातील दोन्ही कोव्हीड उपचार केंद्रात रूग्णांची संख्या वाढल्यामुळे बेडस पुर्ण झाले आहेत. दररोज तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णाचे वाढते प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी संपर्क होऊ नये याकरीता कामाव्यतिरिक्त बाहेर पडु नये असे आवाहन निफाड तालुका गटविकास अधिकारी संदिप कराड व कोरीना संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी केले आहे.
ठळक मुद्देनिफाड तालुक्यातील सध्या ८९९ रूग्ण