दहाव्या मैलावर कोरोना चेकपोस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:19 PM2020-03-24T17:19:35+5:302020-03-24T17:20:04+5:30
ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कंबर कोसळू असताना ओझरच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक उलाढाल असलेला मंगळवारच्या आठवडे बाजारात सुमसाम होती.
ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कंबर कोसळू असताना ओझरच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक उलाढाल असलेला मंगळवारच्या आठवडे बाजारात सुमसाम होती. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली असताना अजूनदेखील काही नागरिकांना कोरोनाची भीती नाही असेच वातावरण अनेक ठिकाणी पाहण्यास मिळाले.त्याची प्रचिती सुद्धा सोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी बघण्यास मिळाली. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली असता अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ज्या दुकांनात लोकं चार पेक्षा अधिक आढळली तेथे पोलिसांनी गर्दी कमी करण्याचे आवाहन केले काही व्यापार्यांना पोलीस चौकीत बोलवत समज दिली. त्यानंतर सर्वच ठिकाणी व्यापारपेठ शांत झाली होती. दहाव्या मैलावर चेकपोस्ट लावण्यात आली होती. त्यात वाहतूक शाखेचे पोलीस, स्थानिक पोलीस, ग्रामपंचायतचे कर्मचारी, आरोग्य विभाग व गाडी नंबर, फोन नंबर व गाडीत किती प्रवासी याची नोंद करण्यासाठी शिक्षकांना तैनात करण्यात आले. ज्यांचे तापमान १०१च्या वर आहे त्यांना आरोग्य केंद्रात फॉर्म भरून पाठवण्यात आले.
------------
एचएएल बंद
एचएएलने कामगारांना ३१ मार्च अथवा पूढील आदेश येई पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेषिगरी राव यांनी लोकमतशी बोलताना सदर माहिती दिली.पुढे त्यांनी बोलताना सांगितले की भारतात जेवढे विभाग आहे तेथे स्थानिक प्रशासन जो निर्णय घेईल तो कंपनीने मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे.कामगारांनी आपल्या तब्येतीची काळजी घेत घरात राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.