बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त तिप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 01:09 AM2021-05-29T01:09:33+5:302021-05-29T01:11:21+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत ९८५ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २,९३१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३९ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,५८९ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत ९८५ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २,९३१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३९ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,५८९ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४२४, तर नाशिक ग्रामीणला ४३३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २० रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १५, तर ग्रामीणला २४ असा एकूण ३९ जणांचा बळी गेला आहे. शहरातील बळींमध्ये काहीशी घट झाली असली, तरीही ग्रामीणच्या बळींमध्ये शहराच्या तुलनेत पुन्हा वाढ झाली आहे. मात्र नवीन कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त तिप्पट झाल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत घट येऊन ती संख्या ११९८७ वर आली आहे.
जिल्ह्यात मृत्यूंच्या संख्येत सातत्याने गत पंधरवड्यापासून ग्रामीणचा बळींचा आकडा वाढला होता.