गुढीपाडव्यावर कोरोनाची सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 06:30 PM2021-04-12T18:30:04+5:302021-04-12T18:30:35+5:30
जुनीशेमळी : गुढीपाडवा सण एक दिवसांवर आल्याने ग्रामीण भागात खेडोपाडी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने हार- कडे खरेदीवर ही कोरोनाचे सावट ...
जुनीशेमळी : गुढीपाडवा सण एक दिवसांवर आल्याने ग्रामीण भागात खेडोपाडी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने हार- कडे खरेदीवर ही कोरोनाचे सावट पसरले असल्याचे चित्र आहे. सध्या खेडोपाडी कोरोनाचे रुग्ण जास्त वाढत असल्याने शासनाने शनिवार रविवार विकेंड निर्बंध केला. व ग्रामस्थांनीही आपली दुकाने बंद ठेऊन या गाव बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विनाकारण घराबाहेर न पडता कोरोनाच्या भितीने घरीच राहणे पसंत केले.
दरम्यान पुन्हा दोन दिवसात कडक निर्बंध लावणार असल्याने कोरोनाच्या भिती पोटी पाडवा सणाचे साहित्य खरेदीसाठी पुरुष व महिला बाजारात जाण्यास धास्तावत आहेत. असे चित्र ही सध्या खेडेगावात दिसत आहे.
गुढीपाडवा सणाला बनविण्यात येणार्या हार-कडे ही या वर्षी कोरोनामुळे बाजारात कमी प्रमाणात विक्रीस असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे नागरिकांचा सण साजरा करतांना फेरसा उत्साह दिसुन येत नाही. विकत पुरण पोळ्या घेण्यापेक्षा घरीच पुरणपोळ्या बनविणार आहोत.
- पूजा बागुल, गृहीणी, जुनी शेमळी.
ह्या वर्षी तेल डाळींत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी आंबे घेऊन रस पोळी नागरिक करत होते मात्र ह्या वर्षी कोरोना चा ससर्ग वाढल्याने आंब्यापेक्षा खिरीलाच पसंती द्यावी लागणार आहे. दादा बागुल, दुकानदार.