शहरात कोरोनामळे सहा जणांचा मृत्यु; रुग्णसंख्या 3 हजार 173
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 08:32 PM2020-07-07T20:32:18+5:302020-07-07T20:32:40+5:30
मंगळवारी नाशिकरोड येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पंचवटी विभागातही दोन जणांचा मृत्यू झाला असून पंचवटीत धोका वाढल्याचे दिसत आहे.
नाशिक : शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असून मंगळवारी (दि. 7) एका दिवसात आणखी सहा जणांचे मृत्यू झाल्यामुळे आता कोरोना बळींची दीड शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे शहरात आतापर्यंत 143 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत 99 कोरोना बाधित आढल्यामुळे बाधितांची संख्या 3173 झाली आहे.
शहरात कोरोना बळींचे प्रमाण वाढतच आहे महापालिकेने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्यानंतर देखील मृत्यूचा दर कमी करण्यात यश आलेले नाही. मंगळवारी एकाच दिवशी शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला. नाशिक येथील एका 54 वर्षे महिलेचा तर देवळाली गाव येथील एका साठ वर्षाच्या वृद्धाचा आणि दत्त मंदिर रोड वर 74 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मंगळवारी नाशिकरोड येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
पंचवटी विभागातही दोन जणांचा मृत्यू झाला असून पंचवटीत धोका वाढल्याचे दिसत आहे. पंचवटी मधील तारवाला नगर येथील 60 वर्षीय वृद्ध पुरुष तसेच गंगोत्री अपार्टमेंट परिसरात पंचवटी येथे देखील एकूण 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे तर जुन्या नाशकात देखील एका 74 वर्षे वृद्धाचा वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत एकूण मृतांची संख्या 143 झाली आहे.
दरम्यान, शहराच्या विविध भागात एकूण 99 कोरोना बाधित आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 3 हजार 173 किती झाली आहे. शहराच्या विविध भागात रुग्ण वाढत असल्यामुळे शहरात सुमारे 216 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. शहरात रुग्णसंख्या 3 हजार 173 झाली असली तरी सध्या 1 हजार 424 रुग्ण उपचार घेत आहेत असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आ