नाशकातील ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:42 PM2021-03-15T23:42:47+5:302021-03-16T00:47:34+5:30
नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच, त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलांचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहर पोलीस आयुक्तालयातील २५ तर ११ ग्रामीण पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान, आयुक्तालयांतर्गत उभारण्यात आलेले पोलीस कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची गरज दिसू लागली आहे.

एकीकडे पुन्हा फैलावणारा कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीस दिवसरात्र रस्त्यावर आहेत. पोलिसांच्या कामाचा ताण आता पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र, अशा स्थितीत कोरोनाची लागण होण्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे पोलिसांकरिता जिकरीचे ठरू लागले आहे.
शहराभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ पाहत असतानाच, पोलिसांनाही या आजाराची बाधा होऊ लागली आहे. शहर पोलीस दलातील ४ पोलीस अधिकारी व ११ अंमलदार आतापर्यंत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे, ग्रामीण पोलीस दलातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. तेथे ११ पोलीस बाधित आढळून आले आहेत. बाधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा पुरेपूर वापरावर पुन्हा भर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यांना कोरोना अलर्ट
मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांना ह्यअलर्टह्ण करत कोरोना आजाराला रोखण्यासाठी आपआपल्या पोलीस ठाण्यांमध्ये अधिकाधिक खबरदारी घेण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मास्कचा नियमित वापर बंधनकारक करण्यात आला आहे, तसेच वेळोवेळी वाहनांचे सॅनिटायझेशन करण्यासही प्राधान्य देण्याबात सांगितले गेले आहे. वयाची पन्नाशी गाठलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गर्दीपासून कसे दूर ठेवता येईल आणि त्या दृष्टीने नियोजन करत, त्यांच्यावर कामगिरीची जबाबदारी सोपविण्याचेही नियोजन सर्वच पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.