कोरोनामुळे बाजार समितीत आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:24 PM2020-03-18T18:24:39+5:302020-03-18T18:25:42+5:30

बुधवारपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणा-या शेतक-यांना मुख्य प्रवेशद्वारावर हाताला सॅनिटायझर्स लावूनच आत प्रवेश दिला जात असून, बुधवारी आठवडे बाजार असला तरी त्याचा मोठा परिणाम बाजार समितीच्या पेठरोडवरील कांदा, बटाटा,

Corona reduced arrivals to the Market Committee | कोरोनामुळे बाजार समितीत आवक घटली

कोरोनामुळे बाजार समितीत आवक घटली

googlenewsNext
ठळक मुद्दे५० टक्के परिणाम : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट कोरोनाच्या सावटामुळे शेतकरी वर्गदेखील चिंतेत सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संपूर्ण जगभरात गेल्या काही दिवसांपासून हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा परिणाम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकऱ्यांवर झाला असून, कोरोनाच्या धास्तीने गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीत साधारणपणे पन्नास टक्क्यांहून अधिक शेतमालाची आवक घटली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, खबरदारी म्हणून बाजार समितीने येणा-या शेतक-यांसाठी सूचना फलक लावण्याबरोबरच शेतक-यांना प्रबोधन केले जात आहे.


बुधवारपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणा-या शेतक-यांना मुख्य प्रवेशद्वारावर हाताला सॅनिटायझर्स लावूनच आत प्रवेश दिला जात असून, बुधवारी आठवडे बाजार असला तरी त्याचा मोठा परिणाम बाजार समितीच्या पेठरोडवरील कांदा, बटाटा, फळबाजार बैल बाजारात जाणवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी एकत्र जमू नये, असे आवाहन करण्यात आले असले तरी, जीवनावश्यक वस्तूंना त्यातून वगळण्यात आले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन शेकडो शेतक-यांची ये-जा सुरू असते. दररोज हजारो क्विंटल शेतमाल येथे विक्रीसाठी येत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या सावटामुळे शेतकरी वर्गदेखील चिंतेत सापडला आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने शेतकरी सध्या बाजार समितीत येण्याचे टाळत आहे. दररोज सायंकाळी दिंडोरी रोडवरच्या बाजार समितीत सुमारे ५० टक्क्यांहून अधिक भाजीपाला आवक घटली आहे. सध्या सर्वच पालेभाज्यांची आवक वाढली असल्याने बाजारभाव कमी झाले आहे, अशी माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली.

Web Title: Corona reduced arrivals to the Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.