मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कोरोना स्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:09 PM2021-04-28T22:09:51+5:302021-04-29T00:43:32+5:30
पेठ : तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती व शासकीय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्याला भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

बुधवार (दि.२८) रोजी झिरवाळ व बनसोड यांनी शासकीय मुलांच्या वसतिगृहात सुरू केलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन भौतिक व आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर व नव्याने उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पाईपलाईनबाबत माहिती जाणून घेतली. पंचायत समितीच्या सभागृहात विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन कुटुंब सर्वेक्षण, कोरोना बाधित रुग्ण संख्या, प्रतिबंधित क्षेत्र, कर्मचारी नेमणूक, कोविड लसीकरण, शासकीय नियम व अंमलबजावणी यासंदर्भात आढावा घेऊन सूचना दिल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, बालविकास प्रकल्पाधिकारी विलास कवाळे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, कोविड सेंटर नोडल अधिकारी डॉ. मोहन गायकवाड, कुमार मोंढे यांचेसह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.