कोरोनाची लस गावांपातळीवर द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 06:46 PM2021-04-12T18:46:07+5:302021-04-12T18:47:15+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाने आपले उग्र रूप दाखविल्याने दिवसेंदिवस रग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने गावापातळीवर कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाने आपले उग्र रूप दाखविल्याने दिवसेंदिवस रग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने गावापातळीवर कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.
सध्या शासनाच्या नियमानुसार ज्या व्यक्तीचे वय ४५ वर्षाच्या पुढे आहे. अशा व्यक्ती स्वयंपूर्तीने कोरोनाची लस घेत आहे.परंतु लस घेतांना ग्रामीण भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कारण कोरोनाची लस दिंडोरी वणी, तळेगाव, वरखेडा आदी ठिकाणीच्या आरोग्य केंद्रात दिल्या जातात. यासाठी नागरिक सकाळपासूनच नंबर लावून बसतात. एका दिवशी किती लसीकरणांचे उद्दिष्टे असते हे नागरिकांना माहित नसल्यामुळे नागरिक गर्दी करतात. व उद्दिष्टे संपले की नागरिकांना विना लस घरी परतावे लागते. परत दुसऱ्या दिवशी लसीकरणांसाठी आरोग्य केंद्रात जावे लागते. त्यामुळे वेळ जातो. अशा एक ना अनेक समस्यांना ग्रामीण भागातील नागरिकांना तोंड द्यावे लागते.
अशा समस्या दुर करण्यासाठी व नागरिकांची अडचण लक्षात घेऊन शासनाने गावांपातळीवर कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी. यासाठी प्रत्येक गावांसाठी आठवड्यातुन दोन किंवा तीन वार निश्चित करण्यात यावे. जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला वेगवेगळ्या समस्यांपासुन दुर राहात येईल.
खाजगी रग्णालयांना पसंती
लवकर नंबर लावून ही लागत नाही. त्यामुळे अनेकांनी पैसे खर्च करून खाजगी रूग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. पैसे गेले तरी चालेल परंतु गर्दीच्या ठिकाणांपासुन दुर राहायचे ही भुमिका सध्या नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे बहुतेक लोकांनी कोरोनाच्या लसीकरणांला खाजगी रूग्णालयाला पसंती दिली आहे.
कोरोनाचे दिवसेंदिवस रग्ण अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठी गावांपातळीवर लस उपलब्ध करून द्यावी. तसेच लखमापूर, दहेगाव, वागळुद आदी गावातील नागरिकांना लखमापूर येथील आरोग्य केंद्रात कोरोनाचे लसीकरण सुरू करावे.
- संगिता देशमुख, सरपंच, लखमापूर.