नाशिक : शहरातील बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव काळात गंगापूररोड परिसरातील वृंदावन लॉन्स येथे दुर्गोत्सव आयोजित केला जातो. यंदा करोनामुळे या उत्सवातील कार्यक्र म रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय फाउंडेशनने जाहीर केला आहे. दुर्गोत्सवाला लागणारा खर्च कोरोनाच्या संकटकाळात जे योद्धा म्हणून कार्यरत आहेत आणि ज्यांना मदतीची गरज आहे, अशा कोरोनायोद्धांना सन्माननिधी म्हणून वापरण्यात येणार आहे.बंगाली बांधवांच्या बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने २०१३ पासून विविध उपक्र म राबविले जात आहे. सावरकरनगर येथे दरवर्षी साजऱ्या होणाºया दुर्गोत्सवात विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन केले जाते. त्यात विशेषत: रोज प्रार्थना, आरती, भोग यांसह सांस्कृतिक कार्यक्र म होत असतात. या कार्यक्र मांचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. बंगाली परंपरांचे जतन आणि महाराष्ट्रीयन भाविकांना या परंपरा माहीत होण्यासाठी हा उत्सव उपयुक्त ठरतो. जगावरील संकटकाळात उत्सव साजरा न करण्याचा निर्णय फाउंडेशनने जाहीर केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरु ण मुखर्जी यांनी दिली. उत्सवातून वाचणाºया खर्चातून कोरोनाशी लढा देणाऱ्यांना मदत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांचे स्वागत ट्रस्टचे कार्यकारी सदस्य अमिताभ चक्र वर्ती, शंतनू रे, शेखर दत्ता, प्रशांत भट्टाचार्य, सुस्लोव बिस्वास, अनिमेश मुखर्जी आदींनी केले आहे. दरम्यान, फाउंडेशनच्या वतीने कोरोनाकाळात शहर पोलिसांना मास्क, हातमोजे, सॅनिटायझर्स आदींचे वाटप तसेच गरजूंना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले आहे.गांधीनगरला गत ६६ वर्षांपासून दरवर्षी अविरतपणे दुर्गोत्सव साजरा केला जातो. यंदा आॅक्टोबरमध्ये दुर्गापूजा आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे असल्याने दुर्गोत्सवाची ही परंपरा खंडित होणार आहे. साडेसहा दशकांनंतर ही परंपरा खंडित होत असली तरी पुढील वर्षी पुन्हा पूर्वीच्याच उत्साहाने दुर्गोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या दुर्गोत्सवाचा निधी हा या दुर्गोत्सवावर अवलंबून असणारे मूर्ती कलाकार, मंडप कारागीर, ढाक हे विशेष बंगाली पूजा वाद्य वाजवणारे कलाकार, दुर्गोत्सव पूजा सांगणारे पंडित तसेच अन्य अवलंबितांना दिला जाणार असल्याचे सार्वजनिक दुर्गापूजा उत्सवाचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता यांनी सांगितले.