कोरोनाबाधित पुन्हा चारशे पार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:27 AM2021-03-04T04:27:24+5:302021-03-04T04:27:24+5:30
नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी तब्बल ४१६ रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात २५९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. ...
नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी तब्बल ४१६ रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात २५९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला तीन जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृतांची संख्या २११७ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २३ हजार ७४९ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १८ हजार ४३४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात ३१८८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.७१ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.८४, नाशिक ग्रामीण ९६.०५, मालेगाव शहरात ९१.७३, तर जिल्हाबाह्य ९३.५४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ४९ हजार ५६ असून, त्यातील चार लाख २२ हजार ९३४ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २३ हजार ७४९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. १४१५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.