कोरोनाच्या बंदिस्त जीवनात तरु णाईची किल्ले भ्रमंतीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:52 PM2020-10-05T22:52:36+5:302020-10-06T01:13:49+5:30
लोहोणेर : कोरोनाच्या बंदिस्त जीवनाला कंटाळत देवळा कळवण तालुक्यातील काही युवावर्ग या भागातील किल्ल्यांवर भ्रमंती करत इतिहासाला उजाळा देत आहेत. कामाच्या व्यापात पर्यटन होत नाही. आणिआता वेळ आहे तर कोरोनामुळे पर्यटनास मर्यादा पडत आहेत. यावर पर्याय काढत येथील तरु णाई कसमादे भागातील विविध किल्ल्यांवर चढाई करत स्थानिक पर्यटन करून घेत आहेत.
लोहोणेर : कोरोनाच्या बंदिस्त जीवनाला कंटाळत देवळा कळवण तालुक्यातील काही युवावर्ग या भागातील किल्ल्यांवर भ्रमंती करत इतिहासाला उजाळा देत आहेत. कामाच्या व्यापात पर्यटन होत नाही. आणिआता वेळ आहे तर कोरोनामुळे पर्यटनास मर्यादा पडत आहेत. यावर पर्याय काढत येथील तरु णाई कसमादे भागातील विविध किल्ल्यांवर चढाई करत स्थानिक पर्यटन करून घेत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घरीच रहा-सुरक्षित रहा या संदेशाचे पालन करत मंडळी सुरु वातीला दोन-तीन महिने घराबाहेर पडली नाहीत. परंतु नंतर मात्र कंटाळवाणे वाटू लागल्याने काही हौशी मंडळींनी मास्क, सॅनिटायझर वापरत व सुरक्षति अंतर राखत येथील गड-किल्ल्यांवर भ्रमंतीचा पर्याय स्वीकारला. तेथील फोटो व्हाट्सएप, फेसबुकवर टाकल्याने इतरांनीही त्यांचे अनुकरण करत एकेक गड-किल्ला पाहण्यास सुरु वात केली. यामुळे येथील दुर्लक्षित गड, किल्लेही उजेडात आले. विनाकारण इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा परिसरातील गड, किल्ले व तेथील इतिहास जाणून घेत ही तरु णाई कोरोनात विरंगुळा मिळवत आहेत. या भागात असे अनेक ग्रुप आहेत कि जे या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत.
या भागात धोडप, मार्केण्डेय, अहिवंतगड, रावळ्या-जावळ्या, कांचनगड, राजधेर, इंद्रायी, अंकाई, साल्हेर, चौल्हेरगड , कण्हेरगड, रामशेज आदी किल्ले आहेत. इतर किल्ल्यांच्या मानाने हे किल्ले तसे दुर्लक्षित आहेत. परंतु आता या किल्ल्यांचा इतिहास उलगडू लागल्याने त्यांचे महत्त् वाढू लागले आहे. यामुळे स्थानिकांना व्यवसाय व रोजगार सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या या किल्ल्यांचे महत्त्व मोठे आहे फक्त त्याला उजाळा मिळण्याची गरज आहे. कोरोनाकाळात त्याची सुरु वात झाली आहे, हे नक्की!
कोरोनाकाळात आम्ही आठ किल्ल्यांवर भ्रमंती केली. स्वराज्याच्या इतिहासाचे हे किल्ले साक्षीदार आहेत. हा इतिहास शोधून काढत तो सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी छायाचित्रे व माहितीचे संकलन करत आहोत.
- शरद पगार, खुंटेवाडी
खरोखर या किल्ल्यांचे महत्त्व मोठे आहे. या किल्ल्यांवर पर्यटन करणे सोपे जावे म्हणून माझे नियोजन चालू आहे. स्थानिकांना रोजगार मिळेल. आगामी काळात येथील पर्यटकांची संख्या निश्चित वाढेल.
- किरण पगार, कळवण
फोटो :
अहिवंतगडावरून सभोवतालच्या प्रदेशाचे निरीक्षण करत व किल्लेचढाईचा आनंद व्यक्त करताना युवक. (05लोहोणेर1)