मालेगावमध्ये कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:33 AM2020-04-09T00:33:13+5:302020-04-09T00:33:25+5:30
मुंबई-पुणे पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत चालले असून गुरुवारी (दि.८) मालेगाव येथील एकाचा कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. याशिवाय, मालेगाव शहरातीलच अन्य चार संशयितांच्या स्वॉबचे नमुने पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. बळी गेलेला रुग्ण हा महिनाभरापूर्वीच सौदीवरुन आल्याचे सांगितले जाते.
नाशिक : मुंबई-पुणे पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत चालले असून गुरुवारी (दि.८) मालेगाव येथील एकाचा कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. याशिवाय, मालेगाव शहरातीलच अन्य चार संशयितांच्या स्वॉबचे नमुने पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. बळी गेलेला रुग्ण हा महिनाभरापूर्वीच सौदीवरुन आल्याचे सांगितले जाते.
मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत ६७ संशयितांच्या स्वॉबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच एका कोरोना संशयिताचा बुधवारी (दि.८) सकाळी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. त्याचा दफनविधी पार पडल्यानंतर सायंकाळी त्याच्या स्वॉबच्या नमुन्याचा पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने पहिला बळी गेला आहे. याशिवाय, अन्य सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अन्य चार संशयितांचेही नमुने पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा पुरती हादरली आहे. नाशिक जिल्ह्णात मंगळवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या दोन होती. त्यात आता मालेगावमधील चौघांची भर पडली आहे.
सौदीत आला होता जाऊन
मालेगाव येथील बळी गेलेला रुग्ण हा महिनाभरापूर्वीच सौदी येथे जाऊन आलेला होता. मालेगावी परतल्यानंतर त्याने आपल्या प्रवासाची माहिती दडवून ठेवली होती. प्रकृती अधिक खालावल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच तो रुग्णालयात दाखल झाला होता. जिल्ह्यात कोरोनाने पहिला बळी घेतल्याने आरोग्य यंत्रणा कमालीची सतर्क झाली असून पोलिसांनीही मालेगावची नाकाबंदी केली आहे. संचार बंदीचे कोणत्याही प्रकारे उल्लघंन होऊ नये म्हणून गुरुवारी (दि. ९) मालेगावी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
नवीन २२ संशयित दाखल
जिल्ह्यातून आतापर्यंत ३१७ संशयिंत रुग्णांच्या स्वॉबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २४३ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असून २७ प्रलंबित आहेत. बुधवारी नवीन २२ संशयित समोर आले आहेत.
मनमाडला होम क्वॉरण्टाइनची यादी व्हायरल
मनमाडमध्ये होम क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या नागरिकांच्या नावाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून, दिशाभूल करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. काही नागरिक लॉकडाउन लागू होण्याअगोदर १० ते १५ दिवस आधी नातेवाइकांकडून घरी अथवा मूळगावी परत आलेले आहेत. अशांनी रुग्णालयात तपासणी करून घेतल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
च्मनमाडला कोणीही कोरोनाबाधित नाही. केवळ सुरक्षिततेचा उपाय म्हणून सार्वजनिक हितासाठी काही व्यक्तींना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. त्यांच्यापासून कुणालाही धोका नाही. अशा लोकांच्या नावांची यादी व्हायरल करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास
ठेवू नये. अशा अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा असून, सायबर अॅक्टनुसार असे कृत्य करणाºयाचा
शोध घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सांगितले.