सिन्नर तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 01:37 PM2020-07-08T13:37:39+5:302020-07-08T13:38:38+5:30

सिन्नर: तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी गेला असून विंचूरदळवी येथील मनोविकार व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ६२ वर्षीय इसमाचा नाशिक जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु असताना कोरोनाने मृृत्यू झाला.

Corona's sixth victim in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी

सिन्नर तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी

Next

सिन्नर: तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी गेला असून विंचूरदळवी येथील मनोविकार व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ६२ वर्षीय इसमाचा नाशिक जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु असताना कोरोनाने मृृत्यू झाला.
विंचूरदळवी येथील ६२वर्षीय इसमास थंडी-ताप आल्याने तो पांढुर्ली येथील एका खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी गेला होता. तेथेच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येते. २९ जून रोजी या रु ग्णास सिन्नर उपजिल्हा रु ग्णालयात स्वॅब तपासणी करु न नाशिक जिल्हा रु ग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. चार जुलै रोजी त्यांचा अहवाल पॉझटिीव्ह आला तर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी दिली. नाशिक येथेच त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या रु ग्णाच्या कुटूंबातील निकटच्या संपर्कातील पाच जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती येथील ग्रामसेवक संजय गिरी यांनी दिली. विंचूरदळवी गावात आत्तापर्यंत आठ कोरोना बाधित रु ग्ण सापडले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात यापुर्वी ठाणगाव, पांढुर्ली, दापूर येथील प्रत्येकी एक तर शिवडे येथील दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona's sixth victim in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक