कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म झाला लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:22 PM2020-06-25T17:22:17+5:302020-06-25T17:24:32+5:30
मानोरी : यंदा ग्रामीण भागात कुलाचारातील महत्त्वाचा भाग असणार्?या जागरण गोंधळाचा आवाज कुठे ऐकू आला नाही. ग्रामीण भागात उन्हाळ्यात लग्न सराई निमित्ताने जागरण गोंधळ घातले जात असतात, मात्र कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील यंदा लॉकडाउन झाल्याने गोंधळी कलाकारांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोनाच्या पाशर््?वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने यंदा यात्रोत्सव देखील बंद आहे. यात्रोत्सव निमित्ताने ग्रामीण भागात जागरण गोंधळ कार्यक्र म घालणे ही जुनी परंपरा असली तरी या परंपरेला कोरोनामुळे छेद गेला आहे. यात्रोत्सव, लगीन सराई आण िइतर वेळेलाही अनेक नागरिक जेजुरीच्या खंडेरायांचे दर्शन घेऊन आल्यानंतर जागरण गोंधळ कार्यक्र म घालतात. या कार्यक्र मांसाठी वाघे-मुरळी ही मोलाची भूमिका बजावतात तर त्यांना वादकांची, गायकांचीही साथ असते. जागरण गोंधळ कलेतून वर्षातून किमान चार ते पाच मिहने या गोंधळी कलावंतांना रोजगार मिळतो. परंतु कोरोनाने ही कलावंत मंडळी बेरोजगार झाले.
कोरोनाने यंदा सर्वांचे आर्थिक गणति कोलमडले असून दरवर्षी आम्ही अनेक ठिकाणी खंडेराव महाराजांच्या जागरण गोंधळ कार्यक्र म धार्मिक गीतांनी पार पाडत असतो. यातून रोजगार निर्मिती देखील चांगल्या प्रकारे होत असते. यंदा कोरोनाने सर्व धार्मिक कार्यक्र मांवर बंदी आल्याने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील होवू शकले नाही, परिणामी अिर्थक फटका बसला आहे.
- शिवाजी भवर, गोंधळ कलाकार, मानोरी.