coronavirus: रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी नाशिककर उतरले रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 11:56 AM2021-04-10T11:56:59+5:302021-04-10T11:57:39+5:30
coronavirus: गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरांमध्ये रेमडीसीवर इंजेक्शनची प्रचंड टंचाई जाणवत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा बांध फुटला आणि त्यांनी शहरातील महात्मा गांधी रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
नाशिक - गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरांमध्ये रेमडीसीवर इंजेक्शनची प्रचंड टंचाई जाणवत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा बांध फुटला आणि त्यांनी शहरातील महात्मा गांधी रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु रेमडीसीवर इंजेक्शन मिळत नसल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून वण वण भटकत आहेत जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात डॉकटर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी पाठवत आहेत त्यामुळे निवडक मेडिकल दुकानांसमोर सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागत आहेत अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबरही कोणी उचलत नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता महात्मा गांधी रोडवर आंदोलन सुरू केले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आज नाशिक मध्ये असून त्यांनी तरी यात लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.